ही आहे पॅनकार्डला आधारकार्ड जोडण्याची शेवटची तारीख

ही आहे पॅनकार्डला आधारकार्ड जोडण्याची शेवटची तारीख

केंद्रीय बोर्ड (सीबीडीटी ) च्या निर्देशानूसार येत्या ३१ तारखेपर्यंत पॅनकार्डला आधारकार्ड जोडणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आयकर रिर्टनस भरणार्यांना आता हा निर्णय बंधनकारक असणार आहे. आयकर कायदा १९६१ नुसार १३९एए या कलमा खाली सीबीडीटीने ३० जून २०१८ ला दिलेला आदेश हा बरोबर असल्याचा निर्णय सर्वोचन्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या निर्णयानूसार सीबीडीटीच्या या पूर्वीच्या आदेशाप्रमाणेच आयकर रिर्टन भरणाऱ्यांना पॅनकार्ड आधारकार्डशी जोडत अंमलबजावणी करावी लागणार असल्याच सांगण्यात आले आहे.

काय होती याचिका

सीबीडीटी च्या आदेशाप्रमाणे पॅनकार्ड आधाकार्डला जोडणे बंधनकारक असल्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर केंद्र सरकार ने दिल्ली सर्वोचन्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दोन व्यक्तींना पॅनकार्ड हे आधार कार्डशी न जोडता आयकर रिर्टन भरण्यास परवानगी दिली होती. या याचिकेवर सर्वोच्चन्यायालयाचे न्यायमूर्ती एक.के सीकरी आणि एस.अब्दुल नजीर यांनी उच्च न्यायालयाने दिलेला आदेश कायम ठेवला आहे. उच्चन्यायालयाने सप्टेंबर २०१८ ला आधार योजनेला मान्यता दिली . मात्र बॅंक खाते, मोबाईल सिमकार्ड, शाळेतील प्रवेश यासाठी करण्यात आलेली आधारची सक्ती मागे घेण्यात आली आहे.

First Published on: February 15, 2019 10:30 PM
Exit mobile version