तीन दिवसांच्या चौकशीनंतर NSE माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अटक, CBI कोर्टाने फेटाळला होता अटकपूर्व अर्ज

तीन दिवसांच्या चौकशीनंतर NSE माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अटक, CBI कोर्टाने फेटाळला होता अटकपूर्व अर्ज

तीन दिवसांच्या चौकशीनंतर NSE माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अटक, CBI कोर्टाने फेटाळला होता अटकपूर्व अर्ज

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)च्या माजी सीईओ आणि मुख्य अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने अटक केली आहे. कथित योगी यांच्या इशाऱ्यावर एनएसईमध्ये निर्णय घेण्यात येत होते असा आरोप चित्रा रामकृष्ण यांच्यावर करण्यात आला आहे. सीबीआयकडून गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरु होती. परंतु चौकशीमध्ये सहकार्य न केल्याने सीबीआयने चित्रा रामकृष्ण यांना अटक केली आहे. त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता परंतु सीबीआय कोर्टाने शनिवारी जामीन अर्ज फेटाळला होता. यामुळे चित्रा रामकृष्ण यांची अटक अटळ होती. रविवारी उशीरा रात्री त्यांना अटक करण्यात आले आहे. चित्रा रामकृष्ण यांना सीबीआय कोठडीत ठेवण्यात आले आहे.

सीबीआयने मार्केट रेग्युलेटरी सेबीच्या सध्याच्या अहवालानंतर कारवाई सुरु केली आहे. दरम्यान चित्रा रामकृष्ण यांनी एनएसई संबंधित माहिती हिमालयातील कथित योगींना दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे. गोपनीय माहिती लीक केल्याच्या चौकशीमध्ये चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयातील कथित योगीचे नाव घेतलं होते. आयकर विभागाकडून मुंबई आणि चेन्नईच्या मालमत्तांवर छापेमारी केली होती.

यापूर्वीच एनएसईचे माजी अधिकारी आनंद सुब्रमण्यम यांना सीबीआयने चेन्नईमधून अटक केली आहे. सीबीआयच्या तपासानुसार एनएसईमध्ये २०१० ते २०१५ या काळात मोठी गडबड झाली आहे. मार्च २०१३ पर्यंत रवि नारायण एनएसई मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर आहेत. यादरम्यान चित्रा कंपनीच्या Deputy CEO होत्या. एप्रिल २०१६ मध्ये रवि नारायण यांची जागा घेतली आणि डिसेंबर २०१६ पर्यंत चित्रा रामकृष्ण या पदावर होत्या.


हेही वाचा : कच्च्या तेलात ‘आग’, कच्चे तेल 139 डॉलरच्या पार, आता 200 च्या पुढे, काय कारण?

First Published on: March 7, 2022 12:12 PM
Exit mobile version