घरअर्थजगतकच्च्या तेलात 'आग', कच्चे तेल 139 डॉलरच्या पार, आता 200 च्या पुढे,...

कच्च्या तेलात ‘आग’, कच्चे तेल 139 डॉलरच्या पार, आता 200 च्या पुढे, काय कारण?

Subscribe

ब्रेंट क्रूडच्या किमती त्यांच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा फक्त 10 पावले दूर म्हणजेच 10 डॉलर मागे आहे. जुलै 2008 मध्ये ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 147.50 डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. इतकेच नाही तर डब्ल्यूटीआय सुद्धा प्रति बॅरल 147.27 डॉलर या भावात होते. 2

नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगाच्या तेल पुरवठ्यावर संकट निर्माण झालेय. सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होत असून, त्यामुळे ब्रेंट क्रूडच्या किमती सातत्याने वाढत आहेत. रशियाकडून ब्रेंट क्रूडच्या होत असलेल्या कमी पुरवठ्यामुळे सोमवारी दरात मोठी उसळी आली आणि किंमत प्रति बॅरल 139.13 डॉलरवर पोहोचली. 2008 नंतर ब्रेंट क्रूडची ही सर्वोच्च किंमत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कच्च्या तेलात सध्या 128 टक्क्यांनी वाढ होत आहे. यूएस क्रूड ऑइल डब्ल्यूटीआय देखील प्रति बॅरल 130.50 डॉलरपर्यंत पोहोचले.

सर्व वेळच्या उच्चांकापासून फक्त 10 पावले दूर

ब्रेंट क्रूडच्या किमती त्यांच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा फक्त 10 पावले दूर म्हणजेच 10 डॉलर मागे आहे. जुलै 2008 मध्ये ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 147.50 डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. इतकेच नाही तर डब्ल्यूटीआय सुद्धा प्रति बॅरल 147.27 डॉलर या भावात होते. 2008 च्या मंदीने जगाच्या अर्थव्यवस्थांना हादरवून सोडले. अमेरिकन बाजारावर खोलवर परिणाम झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीवरही मोठा परिणाम दिसून आला.

- Advertisement -

आता किंमत प्रति बॅरल 200 डॉलरपर्यंत जाऊ शकते

बँक ऑफ अमेरिका (BofA) चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ इथन हॅरिस म्हणतात की, रशियावर निर्बंध लादल्यानंतर त्याच्या बाजूने कच्च्या तेलाचा पुरवठा थांबेल. जर रशियाला दररोज 5 दशलक्ष बॅरल कच्चे तेल मिळणे बंद झाले तर कच्च्या तेलाच्या किमतीही प्रति बॅरल 200 डॉलरच्या पुढे जातील. जगभरातील आर्थिक प्रगतीवर याचा परिणाम होईल.

अचानक भाव का वाढले?

क्रूडच्या किमती अचानक वाढण्याचे कारण रशिया-युक्रेन युद्धानंतर लादण्यात आलेले निर्बंध हे आहेत. युरोपियन युनियनसह रशियाच्या तेल आयातीवर निर्बंध लादण्याची तयारी करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. याबाबत दोघांमध्ये चर्चाही सुरू आहे. याशिवाय इराणकडून तेल आयातीवरील बंदी उठवण्याची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही, त्यामुळे जागतिक बाजारातील पुरवठ्यावर वाईट परिणाम झालाय. फेड रिझर्व्हनेही येत्या काही दिवसांत व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत, याचा अर्थ डॉलर मजबूत होईल, ज्यामुळे क्रूड अधिक महाग होईल.

- Advertisement -

हेही वाचाः Maharashtra Budget Session 2022 : भूसंपादन कायद्यात सुधारणा करण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची विधान परिषदेत घोषणा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -