कार्ती चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयांवर CBI ची छापेमारी, आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप

कार्ती चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयांवर CBI ची छापेमारी, आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप

कार्ती चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयांवर CBI ची छापेमारी, आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे सुपुत्र आणि खासदार कार्ति चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी कऱण्यात आली आहे. बेकायदेशीर व्यवहारांप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ने एकूण ९ मालमत्तांवर छापेमारी केली. त्यांच्यावर तलवंडी साबो पॉवर लिमिटेड प्रकल्पासाठी काम करणाऱ्या चिनी अभियंत्यांकडून लाच घेऊन व्हिसा काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून सीबीआयने चौकशी सुरु केली आहे.

बेकायदेशीर व्यवहारांप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने खासदार कार्ती चिदंबरमच्या चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, ओडिशा येथील जवळपास ९ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. तसेच त्यांच्या जोरबाग आणि चेन्नई येथील निवासस्थानावरही छापे टाकले आहेत. केंद्रीय तपास संस्थेने २०१०-१४ दरम्यान चुकीच्या मार्गाने विदेशी निधी मिळवल्याचा आरोप करत कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध नवीन गुन्हा दाखल केला आहे.

कार्ति चिदंबरम यांची प्रतिक्रिया

केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयच्या छापेमारीनंतर कार्ति चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मी मोजणी विसरलो, असे किती वेळा झाले? नोंद असावी. आशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. किती वेळा छापेमारी झाली, याची आता मी मोजणीच विसरलो असल्याचे कार्ति चिदंबरम म्हणाले आहेत.


हेही वाचा : Gyanvapi masjid news : ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग नाही तर कारंजे सापडले, ओवेसींचा दावा

First Published on: May 17, 2022 12:56 PM
Exit mobile version