Gyanvapi masjid news : ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग नाही तर कारंजे सापडले, ओवेसींचा दावा

Gyanvapi masjid news asaduddin owaisi claims No Shivling but fountain found in Gyanvapi mosque
Gyanvapi masjid news : ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग नाही तर कारंजे सापडले, ओवेसींचा दावा

कोर्टाच्या आदेशानुसार वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेमध्ये नंदी मुर्तीच्या समोर असलेल्या विहिरीमध्ये शिवलिंग सापडले असल्याचा दावा करण्यात येत आहे. हिंदू संघटनांकडून शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. तर मुस्लिम संघटनांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान यामध्ये हे शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. असे कारंजे (फवारे) प्रत्येक मशिदीमध्ये असतात असेही त्यांनी सांगितले आहे.

ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडले असल्याचा दावा एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी फेटाळला आहे. तसेच मशिद समितीकडून सांगण्यात आले आहे की, मशिदीमध्ये शिवलिंग नाही तर फवारा आहे. सर्वच मशिदींमध्ये अशा प्रकारचा फवारा असतो.

कोर्टाच्या समितीकडून मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला नाही. परंतु हिंदु संघटनेच्या वकिलांनी कोर्टात शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. यामुळे कोर्टाकडून या परिसराला सील करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु हा आदेश १९९१ मध्ये संसदेत बनवलेल्या कायद्याच्याविरोधात आहे. जर मशिदीमध्ये शिवलिंग सापडले होते तर कोर्टात समितीमधील कमिश्नरने तसा दावा केला पाहिजे होता असे ओवेसींनी म्हटलं आहे.

शिवलिंग सापडल्याचा दावा

हिंदू संघटनेकडून ज्ञानवापी मशिदीमध्ये साप, कलश, घंटा, स्वस्तिक, स्वान सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. नंदी मुर्ती समोर असलेल्या विहिरीमध्ये शिवलिंग सापडले असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. तसेच कोर्टातही दावा करण्यात आला असून या जागेला सील करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. तीन खोल्यांमध्ये साप, कलश, घंटा, स्वस्तिक, संस्कृत श्लोक आणि स्वान यांच्या मूर्ती सापडल्या आहेत. हा महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच हिंदू मंदिरांचे खांब सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ज्ञानवापी सर्वेक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. मस्जिद समितीने या सर्वेक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : chardham yatra 2022 : चारधाम यात्रेत आतापर्यंत 41 यात्रेकरूंचा मृत्यू; पावसाच्या विश्रांतीनंतर यात्रा पुन्हा सुरू