CBSE 12th Board Exam: पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी घेणार बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बैठक

CBSE 12th Board Exam: पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी घेणार बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बैठक

देशातील बारावी परीक्षेच्या संदर्भात आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बारावी बोर्डाच्या परीक्षांवर महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्य आणि भागधारकांशी महत्त्वपूर्ण बैठकीनंतर पंतप्रधान मोदी बारावी परीक्षांचा महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत.  सरकारने सुप्रीम कोर्टाकडे बारावीच्या परीक्षांच्या अंतिम निर्णयासाठी वेळ मागितला होता त्यानुसार ३१ मे रोजी बारावीच्या परीक्षेसंदर्भात १ जून रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री अंतिम निर्णय घेतील असे सांगण्यात आले. मात्र केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियल यांची आज,मंगळवारी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे आता देशातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा अंतिम निर्णय पंतप्रधान मोदी घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (CBSE 12 Board Exam: Prime Minister Modi will hold an important meeting this evening regarding 12th Board exam)


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, बारावीच्या परीक्षेसंदर्भात देशातील विद्यार्थी आणि पालक खूप चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांना कोरोना लस दिल्याशिवाय त्यांची बारावीची परीक्षा घेऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात. गेल्या वर्षीच्या मार्कांवर त्यांचे मूल्यांकन करावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

CBSE बोर्डाने १५ ते २६ ऑगस्ट दरम्यान बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्याच परीक्षांचे निकाल देण्यात येतील. त्याचप्रमाणे मंडळाने दोन पर्याय दिले आहेत. ज्यात प्रमुख १९ विषयांवर अधिसूचित केंद्रांवर नियमित परीक्षा घेणे किंवा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांमध्ये अल्प कालावधीत परीक्षा घेण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. दिल्लीसह अनेक राज्यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण केल्यानंतरच परीक्षा घ्यावात, असे मत मांडले आहे. महाराष्ट्रातही परीक्षा ने घेता इंटरनल मूल्यमापन करण्याच्या विचारांच्या बाजूने आहे.


हेही वाचा – CBSE-ICSE Board Exam: बारावी परीक्षांचे निर्णय देण्याआधीच केंद्रीय शिक्षण मंत्री AIIMS रुग्णालयात दाखल

First Published on: June 1, 2021 4:54 PM
Exit mobile version