CBSE Sample papers 2021-22: सीबीएसई १० वी, १२ वीच्या टर्म १ परीक्षेचे सँपल पेपर जाहीर, येथे डाऊनलोड करा

CBSE Sample papers 2021-22: सीबीएसई १० वी, १२ वीच्या टर्म १ परीक्षेचे सँपल पेपर जाहीर, येथे डाऊनलोड करा

CBSE Sample papers 2021-22: सीबीएसई १० वी, १२ वीच्या टर्म १ परीक्षेचे सँपल पेपर जाहीर, येथे डाऊनलोड करा

CBSE Sample papers 2021-22 – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या टर्म १ परीक्षेचे सॅपल पेपर आणि मार्किंग स्कीम जाहीर केली आहे. या टर्म १ च्या परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ दरम्यान घेतल्या जाणार आहेत. सीबीएसईने अधिकृत वेबसाईटवर मार्किंग स्कीम आणि सँपल पेपर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून पेपर डाऊनलोड करुन परीक्षेची पूर्व तयारी करत येणार आहे. या सँपल पेपरच्या मदतीने विद्यार्थांना परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची मार्किंग स्कीम कशाप्रकारे असेल याची पूर्व कल्पना येईल. यामुळे बोर्डाची परीक्षा देण्यासाठीची तयारी करण्यासाठी खूप मदत होईल.

अधिकृत नोटीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सीबीएसई अभ्यासक्रम दोन समान भागांमध्ये विभागण्यात आले आहेत. यामुळे टर्म १ आणि टर्म २ भागामध्ये परीक्षा घेतल्या जातील. यात टर्म १ मध्ये MCQs किंवा वस्तुनिष्ठतेवर आधारित पेपर असेल तर ५० टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल. या परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन घेतल्या जातील. ( परिस्थिती पाहून)

सीबीएसई बोर्डच्या टर्म १ परीक्षेच्या गुणांचा वापर सीबीएसई बोर्डाच्या २०२२ चा अंतिम निकाल लावण्यासाठी केला जाईल. केंद्रीय माध्यमिक मंडळ सीबीएसईने गुरुवारी १० वी आणि १२ वीसाठी टर्म १ चा MCQ वर आधारित सॅपल पेपर जाहीर केले आहे.


गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर; १३ विशेष पथक तैनात


 

First Published on: September 2, 2021 8:23 PM
Exit mobile version