घरमहाराष्ट्रगणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर; १३ विशेष पथक तैनात

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर; १३ विशेष पथक तैनात

Subscribe

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलायं. त्यामुळे राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु झालीय. अनेक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळतेय. मात्र राज्यातील कोरोना संकट अद्याप न संपल्याने संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. तर सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान कोरोनाची तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे दिसतायत. मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवानिमित्त काही नियम आखले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांनविरोधात आता कठोर कारवाई केली जाईल.

येत्या गुरुवारुपासून मास्क न घातला रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांकडून कारवाई केली जाईल. यासंदर्भात बुधवारी पार पडलेल्या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्था सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या. यावेळी सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मास्क न घातला फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करावी असेही सांगितले.

- Advertisement -

मुंबई पोलिसांचे विशेष पथक तैनात

गणेशोत्सवानिमित्त मुंबईत पोलिसांची एकूण १३ विशेष पथकं तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, १ एपीआय, १ पीएसआय असे ११ कॉन्स्टेबलचा समावेश असेल. मुंबईत एकूण १३ झोन असून प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल. कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे काम ही पथके करतील.

भक्तांना ऑनलाईन दर्शनाची मुभा

कोरोना संसर्ग लक्षात घेता भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन घ्यावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी सर्व गणेश मंडळांना केले आहे. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी टोकन यंत्रणेची व्यवस्था करावी. जेणे करुन भक्तांची गर्दी होणार नाही, असही आवाहन मुंबई पोलिसांनी मंडळांना केले आहे.

- Advertisement -

मुंबईत गणेशोत्सव नेमका असे कसा?

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगपालिकेने गणेश मंडळांसाठी एक बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवासाठीची नियमावली निश्चित करण्य़ात आली. त्यानुसार मोठ्या मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात न करता विसर्जनस्थळी (चौपटीवर) विसर्जन करता येणार येणार आहे. मात्र ठरावीक कार्यकर्त्यांसह हे विसर्जन करता येईल, तसेच मिरवणूक काढण्यावरही बंदी असेल, असंही बैठकीत ठरलेय.


#SidharthShukla : सिद्धार्थ खूप लवकरं सोडून गेलास, नेहमी आठवणीत राहशील, सलमान खानचे भावनिक ट्वीट


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -