सीबीएसई परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सीबीएसई परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्ड

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २९ मार्च २०१९ या दरम्‍यान होणार आहे. बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०१९ या दरम्यान होणार आहे. सीबीएसई १० वी, १२ वीच्‍या परीक्षांचे वेळापत्रक रविवारी, दिनांक २४ डिसेंबरला जाहीर झाले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्‍या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ते डाऊनलोड करता येणार आहे.

वाचा : ‘सीबीएसई’कडून दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष सवलत!

विद्यार्थ्यांना परीक्षेआधी अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सीबीएसई बोर्डाने सात आठवडे आधीच वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षा सकाळी १० ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. उत्तरपत्रिका सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. तर प्रश्नपत्रिका सव्वा दहा वाजता देण्यात येतील.

वाचा : सीबीएसीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणार अधिक मेहनत

या पूर्वीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगलाच गोंधळ झाला होता. पेपर लीक प्रकरणी दिल्ली, हरयाणा, पंजाब या राज्यांमध्ये हिंसाचार झाला होता. सीबीएसई बोर्डाच्या मुख्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केली होती. दरम्यान, पेपर लीकप्रकरणी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती.

वाचा : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर

First Published on: December 24, 2018 4:18 PM
Exit mobile version