CBSE Datesheet of 10th-12th Term-1 exam: सीबीएसई १० वी, १२ वी परीक्षेच्या पहिल्या सत्राची डेटशीट जारी, असं करा ऑनलाईन चेक

CBSE Datesheet of 10th-12th Term-1 exam: सीबीएसई १० वी, १२ वी परीक्षेच्या पहिल्या सत्राची डेटशीट जारी, असं करा ऑनलाईन चेक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाने 12 डिसेंबर 2023 रोजी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते.

CBSE Datesheet of 10th-12th Term-1 exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभागाने (CBSE)इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्रातील परीक्षांच्या तारखा नुकत्यात जाहीर केल्य़ा आहेत. जारी केलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावीची पहिल्या सत्राची परीक्षा ३० नोव्हेंबरपासून सुरु होणार असून ११ डिसेंबर २०२१ पर्यंत असेल. तर इयत्ता बारावीच्या पहिल्या सत्रातील परीक्षा १ डिसेंबरपासून सुरु होतीस ते २२ डिसेंबर २०२२१ पर्यंत असणार आहे. यात इयत्ता १२ वीच्या १९ मुख्य विषयांची तर १० वीच्या ७ मुख्य विषयांची परीक्षा होईल.
विद्यार्थी परीक्षेचं वेळापत्रक www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल.

सीबीएसई पहिल्या सत्राच्या परीक्षेत कोणताही विद्यार्थ्यांना नापास केले जाणार नाही. टर्म -1 परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतरही विद्यार्थ्यांना ना ही कंपार्टमेंट द्यावा लागेल ना टर्म -1 परीक्षेला पुन्हा हजर राहावे लागेल. बोर्डाच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची माहिती दिली जाईल. सीबीएसईने सर्व शाळांना ही माहिती दिली आहे.

असं पहा ऑनलाईन वेळापत्रक

१) सर्वप्रथम cbse.nic.in अधिकृत वेबसाईटवर जा.

२) त्यानंतर Whats New याच्या लिंकवर क्लिक करा.

३) आता 10 वी किंवा 12 वीच्या लिंकवर क्लिक करा.

४) अशाप्रकारे आता एक पीडीएफ उघडेल, ते डाऊनलोड करा.

यंदा परीक्षांच्या वेळेत बदल 

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थंडीचा विचार करता सीबीएसईकडून परिक्षा सुरु करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दरवर्षी परीक्षा १०.३० ला सुरु व्हायच्या मात्र यंदा या परीक्षा सकाळी ११.३० वाजता सुरु होतील. यात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी २० मिनिटांचा वेळ दिला जाईल.

परीक्षा होणार ऑफलाईन

सीबीएसई बोर्डाच्या माहितीनुसार, सीबीएसई १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. यात बोर्डाने टर्म -1 परीक्षेत केवळ ५० टक्के अभ्यासक्रमावर आधारित पेपर तयार केले जातील, असं सांगितलं आहे.

प्रश्न कसे असणार?

सीबीएसईच्या पहिल्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत.

सीबीएसई बोर्ड परीक्षेचे ठळक मुद्दे

१) परीक्षेची वेळ ९० मिनिटांची असेल.

२) ५० टक्के प्रश्न अभ्यासक्रमातून विचारले जातील.

३) शाळा ११ वाजेपर्यंत चालतील.

४) टर्म -1 आणि टर्म -2 साठीच्या प्रॅक्टिकल परीक्षा वेगळ्या असतील.

५) परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना बोर्डाकडून गुण जाहीर केले जातील.

६) टर्म -2 ची परीक्षा मार्च ते एप्रिल दरम्यान घेतली जाईल.


Attacks on Hindus in Bangladesh : बांग्लादेशमध्ये हिंदूंची घरे जाळल्याप्रकरणी ४५ संशयितांना अटक, अमेरिकेकडून हल्ल्याचा निषेध

First Published on: October 19, 2021 8:34 AM
Exit mobile version