CDS : बिपीन रावत सांभाळत होते ते CDS पद नेमकं काय आहे? त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात?

CDS : बिपीन रावत सांभाळत होते ते CDS पद नेमकं काय आहे? त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात?

CDS : बिपीन रावत सांभळत होते ते CDS पद नेमकं काय आहे? त्यांच्या जबाबदारी काय असतात?

देशाच्या संरक्षण दलांचे पहिले सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचा तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. देशातील तीन प्रमुख दलांची जबाबदारी ते सांभाळत होते. मात्र त्यांच्या निधनाने आत्ता सीडीएस हे पद रिक्त झालेय. २०१९ मध्ये रावत यांची सीडीएस पदावर नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर हे पद फार काळ रिक्त ठेवणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. मात्र सध्या सीडीएस पद नेमक काय? अशी चर्चा सुरु झालीय जाणून घेऊ सीडीएस पद नेमक काय आहे….

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट २०१९ मध्ये लालकिल्ल्यावरून सीडीएस पदाची घोषणा केली. या घोषणेनंतर संरक्षण विभाग मंत्रिमंडळाच्या समितीनं CDS पदाच्या निर्मितीला मंजुरी दिली. यानंतर पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झालेले जनरल बिपिन रावत यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

भारतीय सेनेतील तीन प्रमुख दल म्हणजे लष्कर, वायूदल आणि नौदल यांच्या कामकाजात समन्वय साधणं तसंच देशाची लष्करी ताकद वाढवणं, हे CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचं प्रमुख काम असते. या पदाचा कार्यभार बिपिन रावत यांनी ३१ डिसेंबर २०१९ मध्ये स्वीकारला त्यांनतर सलग तीन वर्षे ते हे पद सांभाळत होते.

नेमकं सीडीएस पदावरील अधिकाऱ्याचे काम काय असते?

सीडीएस अधिकारी हा संरक्षण मंत्र्यांचा प्रमुख सल्लागार असल्याने लष्कराच्या तीन प्रमुख विभागातील कामांवर त्यांना लक्ष ठेवावे लागते. त्यांच्याकडे डिफेन्स एक्विजिशन कौन्सिल आणि डिफेन्स प्लॅनिंग कमिशन या संरक्षण मंत्रालयातील महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी असते.

संरक्षण मंत्रालयातील लष्कर विभागाचे सचिव म्हणून ते काम पाहतात. संरक्षण मंत्रालयाचा हा पाचवा आणि नवा विभाग आहे. यात लष्करातील खरेदी, प्रशिक्षण आणि रिक्त जागा भरण्यासाठी प्रोत्साहन देणे. तसेच संरक्षण दलात नवे बदल किंवा तात्काळ निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांची असते.

जॉइंट, थिएटर कमांडची स्थापना करत लष्करातील कमांडोची पुनर्गठन सुलभ करणे. यात अंदमान निकोबार, स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड, अंतराळ, सायबर आणि स्पेशल फोर्स कमांडसारख्या ट्राय सर्व्हिस एजन्सीचे प्रमुख असतात. तसेच ते ‘चीफ ऑफ स्टाफ’ कमिटीचे (सीओएससी) स्थायी अध्यक्ष पदावर असतात. तर न्यूक्लियर कमांड अथॉरिटीचे सल्लागार म्हणून देखील काम पाहतात.

या पदावरील व्यक्तीला वैयक्तिक आणि व्यवस्थेशी संबंधित प्रकरणांवर राजकीय नेतृत्वाला निष्पक्ष सल्ला देणे आवश्यक असते. यांना वेतन आणि इतर सुविधा या इतर सेना प्रमुखांसारख्याच असतात. मात्र ते वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त होतात. तर लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख हे वयाच्या ६२ व्या वर्षी निवृत्त होतात.

कोणत्या दलाला, काय हवं काय नको, ते तातडीनं कसं होईल याची जबाबदारी सीडीएस पार पाडतात. तिनही दलात समन्वय ठेवून लष्कराची एनर्जी ठेवण्याचं प्रमुख कामही सीडीएसचच आहे.

मात्र जनरल रावत यांच्या निधनानंतर आत्ता नवे सीडीसी कोण होणार याची नावे समोर येत आहे. यात आघाडीवर लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे यांचे नाव घेतले जातेय. बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची मिटींग झाली. या बैठकीत नव्या सीडीएस अधिकाऱ्यांच्या नावावर चर्चा झाल्याचा अंदाज आहे.

त्यामुळे जनरल एमएम नरवणे यांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. नरवणे हे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत. रावत यांनी गेल्या काही काळात सीडीएस म्हणून ज्या मोहिमा, काम हाती घेतले त्याची माहिती आणि अनुभव हा जनरल नरवणेंनाच आहे. त्यामुळे नरवणे यांना सीडीएस प्रमुख म्हणून नेमले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय वायूदल प्रमुख व्ही,आर. चौधरी, यांना अलीकडेच एअरफोर्सची जबाबदारी हाती घेतली. तर नेव्ही प्रमुख आर, हरीकुमार यांनीही ३० नोव्हेंबरला सूत्र हाती घेतली. मात्र सीडीएसच्या पदासाठी जनरल नरवणेंची जी पात्रता, अनुभव आहे ती इतरांकडे नाही. त्यामुळेच जनरल नरवणेंचं नाव आघाडीवर आहे.


 

 

First Published on: December 9, 2021 2:07 PM
Exit mobile version