पाककडून गोळीबार; १ जवान शहीद तर कुपवाडामधील इंटरनेट सेवा बंद

पाककडून गोळीबार; १ जवान शहीद तर कुपवाडामधील इंटरनेट सेवा बंद

ऐन दिवाळी सण तोंडावर आला असताना पाकिस्तानाकडून खुरापती सुरुच असल्याचे समोर आले आहे. वारंवार शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबरोबरच घुसखोरीचे देखील प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानने आपल्या भ्याडपणा दाखवत शुक्रवारी नियंत्रण रेषेवर (LOC) विविध भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. या दरम्यान भारताचा एक जवाव शहीद झाला असून एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. तर आणखी एक नागरिक जखमी झाला आहे. जखमी नागरिकास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्य्ये इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळ करेनपासून ते उरी सेक्टरपर्यंत अनेक ठिकाणी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर देत आहे. बारामुल्ला येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. या कारवाईत जखमी झालेला बीएसएफ जवान राकेश डोभाल शहीद झाले आहेत. राकेश डोभाल हे उत्तराखंडमधील ऋषिकेशच्या गंगानगरचे रहिवासी होते. ते बीएसएफ आर्टी रेजिमेंटचे सदस्य होते आणि कॉन्स्टेबल पदावर तैनात होते.

बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, आज १२ वाजून २० मिनिटांनी पाक सैनिकांशी दोन हात करताना जवानाच्या डोक्याला गोळी लागली होती. तर दुसरीकडे पुंछ जिल्ह्यातील सवजियान परिसरात देखील पाकिस्तानने गोळीबार केला. तेथेही भारतीय सेनिक जशासतसे उत्तर देत आहेत.


हेही वाचा – भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या ५ लाखांहून कमी


 

First Published on: November 13, 2020 5:24 PM
Exit mobile version