मॅसेजच्या सोर्सबद्दल माहिती मागणे हे गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन नाही – केंद्र सरकार

मॅसेजच्या सोर्सबद्दल माहिती मागणे हे गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन नाही – केंद्र सरकार

WhatsApp

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला २५ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या नवीन नियमांचे पालन का केले नाही, अशी नोटीस बजावली होती. या नवीन नियमांनुसार Whatsappला मॅसेजचा सोर्स सांगावा लागले. म्हणजेच मॅसेज ट्रेस करावा लागले, असा नियम होता. पण Whatsappने युजर्सचे मॅसेज ट्रेस करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने Whatappला उत्तर दिले आहे की, मॅसेजच्या सोर्सबद्दल माहिती मागणे हे गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन नाही. याबाबतचे ट्वीट एएनआयने केले आहे.

केंद्र सरकारने सांगितले की, ‘भारत सरकार गोपनियतेच्या अधिकाराचा आदर करते. Whatsappला एखाद्या मॅजेसचा सोर्स सांगितले गेले तर याचा अर्थ गोपनियेतच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही.’ केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने म्हटले की, ‘अशा प्रकारची गरज तेव्हा भासते, जेव्हा कोणताही एखादा मॅसेजच्या प्रसारावर रोख लावावी लागते किंवा त्या मॅसेजचा तपास करावा लागतो.’

दरम्यान एकीकडे Whatsapp गोपनियता धोरण लागू करण्याची मागणी करत आहे. जेणेकरून आपल्या सर्व युजर्सचा डाटा आपल्या मूळ कंपनी फेसबुकला शेअर करेल. तर दुसरीकडे Whatsapp कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि खोट्या बातम्यांवर आळा घालण्यासठी आवश्यक मार्गदर्शन सूचना लागू करण्यासाठी नकार देण्याचा प्रयत्न करत आहे, असे आयटी मंत्रालयाने सांगितले. सरकारने म्हटले की, ‘देशातील सर्व कामे कायद्यानुसार झाली पाहिजे. Whatsappचे मार्गदर्शक नियमांचे पालन करण्यास नकार हे कायद्याचे उल्लंघन आहे.’


हेही वाचा – ICAI CA Exams 2021: ५ जुलैपासून सीएच्या इंटर्मिडीएट आणि फायनल परीक्षा होणार सुरु


 

First Published on: May 26, 2021 9:20 PM
Exit mobile version