लशीच्या उपलब्धतेवरून केंद्र सरकारचा यू टर्न, २१६ कोटी लसींवरून १३५ कोटी लसींचा दावा

लशीच्या उपलब्धतेवरून केंद्र सरकारचा यू टर्न, २१६ कोटी लसींवरून १३५ कोटी लसींचा दावा

door to door vaccination : केंद्राचा मोठा निर्णय, देशात नोव्हेंबरपासून घरोघरी जाऊन होणार लसीकरण

कोरोनाचा कहर रोखण्यासाठी लस हे एकमेव साधन असल्याने देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. पण आता केंद्र सरकारने यू टर्न घेतल्याने पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मे महिन्यात देशात लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत २१६ कोटींहून अधिक लशींचे डोस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. पण सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने डिसेंबरपर्यंत फक्त १३५ कोटी डोसच उपलब्ध होऊ शकतात असे स्पष्ट केले. यामुळे महिन्याभरातच केंद्राने ८१ कोटी डोस कमी केले आहेत. (central govt take you turn on availibility of vaccination )

१३ मे रोजी केंद्र सरकारने सांगितले होते की ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत २१६ कोटी लशींचे डोस उपलब्ध होतील. ज्यामुळे यावर्षाखेर संपूर्ण देशात लसीकरण होईल. पण आता मात्र ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान १३५ कोटी डोसच मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तसेच केंद्राने सुरुवातीला देशात ८ लशी उपलब्ध होतील असेही सांगितले होते. पण आता फक्त ५ लस मिळणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा लसीकरणासंदर्भात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Coronavirus : कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा ठरणार घातक? तज्ज्ञांचे स्पष्टीकरण

First Published on: June 27, 2021 11:43 AM
Exit mobile version