घरCORONA UPDATECoronavirus : कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा ठरणार घातक? तज्ज्ञांचे स्पष्टीकरण

Coronavirus : कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा ठरणार घातक? तज्ज्ञांचे स्पष्टीकरण

Subscribe

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या सातत्याने घसरत आहे. मात्र आता डेल्टा व्हेरियंटमुळे देशासमोरील चिंता वाढली आहे. देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे दुसरी लाट उद्भवली, मात्र आता डेल्टा विषाणूचा म्युटेट झाल्याने तो डेल्टा प्लस झाला आहे. याच डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे आता देशात कोरोनाची तिसरी लाट तयार होणार अशी भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्था पूर्ती कोलमडून गेली. अनेक रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शन, औषधे, प्लाझ्मा न मिळाल्याने जीव गमवावा लागला. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणा अक्षरश: मोडकळीस आली, त्यामुळे तिसऱ्या लाटेत काय परिणाम होणार याची चिंता सर्वांना सतावत आहे. यातच आयसीएमआरने संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्य़ा लाटेइतकी गंभीर नसेल असे म्हटले आहे. तसेच लसीतरण अभियानाला गती दिल्यास भविष्यात येणाऱ्या कोरोना संकटाला सक्षमपणे तोंड देता येईल असेही या अहवालात नमूद केले आहे.

- Advertisement -

एकूणच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेंमुळे काय धोका निर्माण होऊ शकतो. याचा आढावा या आयसीएमआरच्या अहवालात घेण्यात आला आहे. या अहवालात एकदा कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते. अशी भीतीही आयसीएमआरने व्यक्त केली आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गर्भवती सर्वाधिक गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे गर्भवती महिलांना कोरोनाचा धोका निर्माण झाला होता. मात्र आता लस उपलब्ध झाल्याने गर्भवती महिलांनी लस घ्या कारण अशा महिलांच्या सुरक्षेसाठी लस उपयुक्त आहे. अशा मार्गदर्शन सुचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत अशी माहिती आयसीएमआरचे डीजी. डॉ.बलराम भार्गव यांनी सांगितले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -