आता AIIMSमध्ये सर्व चाचण्या होणार मोफत; आरोग्य मंत्रालयाने शिफारशी केल्या मंजूर

आता AIIMSमध्ये सर्व चाचण्या होणार मोफत; आरोग्य मंत्रालयाने शिफारशी केल्या मंजूर

आता AIIMSमध्ये सर्व चाचण्या होणार मोफत; आरोग्य मंत्रालयाने शिफारशी केल्या मंजूर

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (AIIMS) रुग्णांच्या उपचारासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. एम्सने आता ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सर्व मेडिकल चाचण्यांचे पैसे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. यासंबंधित करण्यात आलेल्या शिफारशीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ही शिफारस जवळपास चार वर्षांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आली होती.

माहितीनुसार, या निर्णयानंतर आता एम्समध्ये रक्त तपासणीपासून एक्सरे, सीटी स्कॅन इत्यादी चाचण्याची सुविधा मोफत मिळेल. अजूनपर्यंत या सर्व चाचण्यासाठी एम्समध्ये असलेल्या काउंटरवर पैसे दिले जात होते. मात्र आता या चाचण्या मोफत होणार आहेत.

एम्समध्ये दररोज जवळपास ५० ते ८० हजार चाचण्या ५०० रुपयांपर्यंतच्या केला जातात. परंतु आता या चाचण्या मोफत केल्यानंतर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. दररोज होणाऱ्या हजारो चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. तसेच रुग्णांना या चाचण्याचे अहवाल त्याच दिवशी ऑनलाईन दिले जातील.

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्याद्वारे नोव्हेंबर २०१७मध्ये यासंबंधित केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला शिफारस केली होती. या शिफारशीमध्ये संचालक म्हणाले होते की, ‘अशा प्रकारच्या चाचण्या आणि उपचारांसाठी रुग्णांना खूप पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे या रुग्णांना दिलासा देण्यासाठी हे शुल्क रद्द करून ते पूर्णपणे मोफत करण्यात यावे.’ त्यानुसार चार वर्षांनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एम्सची शिफारस मंजूर केली आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: भारतात मंजुरी मिळालेल्या Covovax आणि Corbevax या लसींबाबत जाणून घ्या


 

First Published on: December 28, 2021 4:26 PM
Exit mobile version