Central Vista Project: नव्या संसद भवनाचे काम राहणार सुरु, दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळत लावला १ लाखांचा दंड

Central Vista Project: नव्या संसद भवनाचे काम राहणार सुरु, दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळत लावला १ लाखांचा दंड

Central Vista Project: नव्या संसद भवनाचे काम राहणार सुरु, दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळत लावला १ लाखांचा दंड

केंद्रातील नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या नेतृत्वात सुरु असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम विनाअडथळा सुरुच राहणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयात संसद भवनाचे काम थांबविण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेवर अंतिम निर्णय देत याचिका फेटाळून लावली आहे. याचिकाककर्त्या अन्या मल्होत्रांनी दाखल केलेल्या याचिकेवर प्रश्न उपस्थित करत याचिका फेटाळून १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आता सेंट्रल विस्टाचे काम यापुढे सुरुच राहणार आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने यापुर्वी अन्या मल्होत्रा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना आपला निर्णय राखून ठेवला होता. परंतु आज(सोमवारी) याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळत १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मल्होत्रा यांच्या याचिकेवर देखील उच्च न्यायालयाने शंका उपस्थित केल्या आहेत. सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम यापुढे सुरुच राहिल असे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाकर्ते अन्या मल्होत्रा यांनी सेंट्रल विस्टा प्रकल्पाविरोधा याचिका दाखल केली होती. या याचिकेत असे म्हटले होते की, कोरोना वायरसरच्या संकटात देश असताना अशा कोणत्याही प्रकल्पाला मान्यता देण्यात येऊ नये. या प्रकल्पामुळे अनेक नागरिक,मजुरांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे याचिके म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात मागील सुनावणीत केंद्र सरकारचे बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली होती. दरम्यान सॉलिसिटर तुषार मेहता यांनी पुढे म्हटले होते की, सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम सुरु असताना सर्व कोरोना नियमांचे पालन करण्यात येणार आहे. तसेच याचिकाकर्त्यांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले होते.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात कोणत्या इमारतीचे बांधकाम होणार

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचे आणि नवीन निवासी संकुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. पंतप्रधान व उपाध्यक्ष आणि केंद्रीय सचिवालय यांच्या निवासस्थान बांधले आहे. कार्यालयांसाठी अनेक नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. सेंट्रल विस्टा प्रकल्प सप्टेंबर २०१९ मध्ये जाहीर करण्यात आला होता. तसेच १० डिसेंबर २०२० रोजी या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती.

First Published on: May 31, 2021 3:20 PM
Exit mobile version