केंद्राचा मोठा निर्णय ! आता लसीकरण केंद्रावरही नोंदणी करता येणार

केंद्राचा मोठा निर्णय ! आता लसीकरण केंद्रावरही नोंदणी करता येणार

Corona vaccine :

देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. या लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊनही लसीसाठी नोंदणी करता येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. ही सुविधा सध्या केवळ शासकीय कोविड लसीकरण केंद्रासाठी मर्यादित आहे. खासगी लसीकरण केंद्रावर ही सुविधा उपलब्ध होणार नाही,असे केंद्राने स्पष्ट केले आहे. खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी ऑनलाईन लसीकरण नोंदणी करावी लागणार आहे. लसीचा होणारा अपव्यय कमी करण्यासाठी आणि मोबाईल फोन इंटरनेटवर लसीच्या नोंदणीसाठी मर्यादित प्रवेश असल्यामुळे केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

राज्य व केंद्रशासित प्रदेशाने लसीचा अपव्यय कमी करण्यासाठी आणि १८ ते ४४ वयोगटातील पात्र लाभार्थींना लसीकरण सुलभ करण्यासाठी अतिरिक्त पर्याय म्हणून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी नागरिकांना लसीकरण सेवा पुरविण्यासाठी राखीव सत्रांचे आयोजन केले जाऊ शकते. जिथे लाभार्थ्यांनी एकत्र करुन पुऱ्याश्या संख्येने एकत्रित लसीकरण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सर्व जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांना १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर नोंदणी आणि ठरलेल्या सुविधांचा उपयोग करताना सरकारच्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने लसीकरणासाठी कोविन वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र दिवसाच्या शेवटी ऑनलाइन नोंदणी केलेले लाभार्थी लसीच्या दिवसी लस घेण्यास न आल्याने  लसीचे काही डोस न वापरता सोडले जाऊ शकतात. अशा वेळी लसीचा अपव्यय कमी करण्यासाठी काही लाभार्थ्यांना साइटवर नोंदणी करणे आवश्यक असू शकते.


हेही वाचा – कोरोना नैसर्गिक आजार आहे, यावर विश्वास बसत नाही – डॉ. अ‍ॅंथनी फौची

 

 

First Published on: May 24, 2021 3:37 PM
Exit mobile version