घरCORONA UPDATEकोरोना नैसर्गिक आजार आहे, यावर विश्वास बसत नाही - डॉ. अ‍ॅंथनी फौची

कोरोना नैसर्गिक आजार आहे, यावर विश्वास बसत नाही – डॉ. अ‍ॅंथनी फौची

Subscribe

चीनच्या लॅबमधून कोरोनाच्या व्हायरसच्या उत्पत्तीच्या निमित्ताने अनेक तर्क वितर्कांना आता उधाण आले आहे. अशातच अमेरिकेतील बायडन प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार असलेले डॉ अ‍ॅंथनी फाऊची यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. कोरोना महामारी नैसर्गिक आहे की ? लॅबमध्ये निर्माण करण्यात आलेले बायोलॉजिकल वेपर आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक देश कामाला लागलेले असतानाच फौची यांचे मोठे विधान समोर आले आहे. कोरोना हा नैसर्गिक आजार असू शकत नाही, हा नैसर्गिक आजार असल्याचे स्विकारणे सोप नाही असे विधान फौची यांनी केले आहे.

एका मुलाखतीमध्ये फौची यांना कोरोना व्हायरच्या उत्पत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. नैसर्गिक पद्धतीने कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली असावी का ? असा प्रश्न फौची यांना विचारण्यात आला होता. त्यावर फौची यांनी नाही असे उत्तर दिले. मला हा व्हायरस नैसर्गिक असल्याचे वाटत नाही, यावर माझा विश्वासही नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या गोष्टीवर आता संशोधन होत आहे की चीनमध्ये हा व्हायरस कुठून आला. ज्यांनी आतापर्यंत या व्हायरसवर संशोधन केले आहे, त्यानुसार हा व्हायरस प्राण्यांमधून माणसांमध्ये आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पण या व्हायरसच्या उत्पत्तीचे कारण दुसरेही असू शकते. अमेरिकन तज्ञांच्या मते या व्हायरसच्या उत्पत्तीवर संशोधन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे याचे मूळ शोधणे शक्य होईल असे तज्ञांचे मत आहे.

- Advertisement -

कोरोनामागे चीनचा हात ?

कोरोना व्हायरसच्या निमित्ताने आता वेगवेगळ्या थिअरी समोर येत आहेत. सुरूवातीला वटवाघुळातून हा व्हायरस निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर हा लॅबमध्ये झालेला प्रयोग असल्याचे सांगण्यात आले. आता बायोलॉजिकल हत्यार म्हणून वापर झाल्याचाही दावा करण्यात येत आहे. या व्हायरसच्या संशोधनासाठी जागतिक पातळीवर चौकशीही सुरू करण्यात आली आहे. चीनने या चौकशीत अतिशय नगण्यपणे असे सहकार्य केले आहे. अमेरिकेसह जगभरातील महासत्ता असलेले देश हे चीनला या महामारीसाठी दोषी ठरवत आहेत.


 

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -