‘चॅम्पियन’ ड्वेन ब्राव्हो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

‘चॅम्पियन’ ड्वेन ब्राव्हो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

क्रिकेटर ड्वेन ब्राव्हो

वेस्ट इंडीजचा ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र ३५ वर्षीय ब्रावो जगभरात होणाऱ्या फ्रेंचायजी टी-२० क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. सध्या वेस्ट इंडीजची टीम भारतात वनडे सीरीज खेळत असून ब्रावो त्यात सहभागी नाही. २००४ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करणाऱ्या ड्वेन ब्राव्होने वेस्ट इंडीज संघाकडून ४० टेस्ट, १६४ वनडे आणि ६६ टी-२० मॅचेस खेळल्या आहेत. मात्र आज त्याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यापुढे ब्राव्होला वनडेमध्ये खेळताना पाहता येणार नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

पदार्पणाचा पहिला दिवस आठवला 

आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या टीममधून ब्राव्होने टी-२० मॅचेस खेळल्या आहेत. आपल्या निवृत्तीबाबत बोलताना ब्राव्हो म्हणाला, आज मी क्रिकेट जगतात हे जाहीर करू इच्छितो की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. परंतू क्रिकेटर म्हणून माझा खेळ तुम्ही यापुढेही पाहू शकाल. वेस्ट इंडीजमधून क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या १४ वर्षानंतरही मला जुलै २००४ सालातील लॉर्डस मैदानावर खेळलेली मॅच लक्षात आहे. त्यावेळी मी पहिल्यांदा वेस्ट इंडीजची टोपी परिधान केली होती. ज्या उत्साहाने मी क्रिकेटमध्ये प्रवेश केला, तोच उत्साह मी संपूर्ण करिअरमध्ये कायम ठेवला.

ब्राव्होचे क्रिकेट करिअर 

२०१० साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्राव्होने एकूण ४० टेस्ट मॅचेसमध्ये २२०० रन बनवले आहेत. त्यात तीन शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याशिवाय टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ८६ विकेट्सचीही नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ब्रावोने १६४ मॅचेसमध्ये २९६८ रन आणि १९९ विकेट्स घेतल्या आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये ११४२ रन आणि ५२ विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

First Published on: October 25, 2018 1:55 PM
Exit mobile version