एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. एसबीआयने लॉकडाऊन काळात ग्राहकांना दिलेली ३ महिन्यांची सूट पुढे वाढवलेली नाही आहे. एसबीआयने दिलेल्या सूटची मुदत ३० जून रोजी संपली. कोरोना मधून तसंच इतर बँक एटीएममधून मोठ्या व्यवहारांसाठी सेवा शुल्क माफ केलं होतं. या संदर्भात बँकेने आपल्या संकेतस्थळावरही माहिती दिली होती. दरम्यान, आता नियमांमध्ये बदल केला आहे.

बचत बँक खात्यात सरासरी २५ हजार मासिक शिल्लक (एएमबी) असलेल्या खातेधारकांना आठ विनामूल्य व्यवहाराची परवानगी असणार आहे. ज्यामध्ये एसबीआयच्या एटीएममध्ये पाच व्यवहार आणि तीन मेट्रो सेंटर (मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलाकाता, बेंगलुरू) बँक एटीएममध्ये व्यवहार करता येणार आहे. त्याचबरोबर, महानगर नसलेल्या शहरांमधील अशा खातेदारांना एसबीआय एटीएममध्ये पाच आणि इतर पाचसहित १० विनामूल्य व्यवहार करता येणार आहेत.

 

First Published on: July 2, 2020 6:58 PM
Exit mobile version