छत्तीसगड: नक्षलवाद्यांच्या चकमकीत २२ जवान शहीद, ९ नक्षलवादी ठार तर २१ बेपत्ता

छत्तीसगड: नक्षलवाद्यांच्या चकमकीत २२ जवान शहीद, ९ नक्षलवादी ठार तर २१ बेपत्ता

छत्तीसगड: नक्षलवाद्यांच्या चकमकीत २२ जवान शहीद, ९ ठार तर २१ बेपत्ता

छत्तीसगडमधील बस्तरच्या बिजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत २२ जवानांना वीर मरण आले आहे. तर ३२ हून अधिक जवान जखमी झाले आहेत. दरम्यान जवळपास ९ नक्षलवादी या चकमकीत ठार झाले आहेत. बिजापूरच्या तर्रेम भागातील जोनागुडाच्या डोंगरात नक्षलवाद्यांनी जवळपास ७०० जवानांना घेरले होते. जवळपास ४ तास ही चकमक सुरु होती. अद्याप या ठिकाणी बचाव पथक पोहोचले नसल्याची माहिती समोर येत आहे. बेपत्ता जवानांचा शोध सुरु असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत जवानांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी झाले आहेत.

छत्तीसगड राज्यातील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कोब्रा कमांडो, बस्तारिया बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाच्या २००० जवांनानी नक्षलवाद्यांविरोधी शोध अभियान सुरू केले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी ७०० जवानांना घेरत तिन्ही बाजूंनी बेझूट गोळीबार केला. याचदरम्यान २२ जवान शहीद झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. तर नक्षलवाद्यांनी जवानांकडून दोन डझनहून अधिक शस्त्रे लुटली आहेत.

या घटनेच्या ठिकाणी १८० नक्षवाद्यांशिवाय कोंटा एरिया कमेटी, पामेड एरिया कमेटी, जगरगुंडा एरिया कमेटी आणि साबागुडा एरिया कमेटीचे जवळपास २५० नक्षलवादीही होते. नक्षलवादी दोन ट्रॅक्टरमध्ये मृतदेह घेऊन गेल्याची माहिती महानिरीक्षक पी.सुंदरराज यांनी दिली आहे.

या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांना छत्तीसगडमध्ये जाण्याचे आदेश दिले होते. यानंतर महासंचालक कुलदीप सिंह छत्तीसगडमध्ये दाखल झाले आहेत. यानंतर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. यासोबतच छत्तीसगडच्या मुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद या घटवेचा निषेध केला आहे. यावेळी त्यांनी जवानांचे शौर्य देश विसरणार नाही असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली व्यक्त

या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर दु:ख व्यक्त करत या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं सांगितलं. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील संदेशात म्हटलं आहे की, “माझ्या संवेदना मावोवाद्यांच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या जवानांच्या परिवारासोबत आहेत. त्यांचे बलिदान कधीही विसरण्यात येणार नाही.”

अमित शहा यांच्या नक्षवाद्यांना गंभीर इशारा

नक्षलवादी हल्ल्यात शूर जवानांचे बलिदान देश विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत. आम्ही शत्रूच्याविरोधात कारवाई सुरूच ठेवू, असा गंभीर इशारा अमित शहांनी नक्षलवाद्यांना दिला आहे. तसंच छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या संपर्कात

नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या ७ जवानां प्रकृती आता चांगली आहे. पण अद्याप २१ जवान बेपत्ता आहेत आणि त्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला आहे. सीआरपीएफचे डीजीही छत्तीसगडमध्ये आहेत. मी आज संध्याकाळी छत्तीसगडला रवाना होतोय, अशी माहीती मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली. ते सध्या गुवाहाटीमध्ये आहेत.


 

First Published on: April 4, 2021 3:07 PM
Exit mobile version