छत्तीसगडमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा खात्मा

छत्तीसगडमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा खात्मा

पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताच्या जवानाला वीरमरण

जम्मू–काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती या सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत – पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या तणावामुळे जम्मूतील अनेक ठिकाणी अशा लहान–मोठ्या चकमकी सुरू असून आज पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित सुकमा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी डब्बाकोंटा परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत एका नक्षलवाद्या खात्मा करण्यात आला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्याजवळील रायफलसह अन्य शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

अनेक नक्षलवादी जखमी

छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित सुकमा जिल्ह्यात डब्बाकोंटा परिसरात नक्षलवाद्यांचे म्होरके लपून बसल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोधमोहिम हाती घेतली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबाराला पोलिसांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. तर अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत. पोलिसांनी परिसराला घेरले असून, शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.


हेही वाचा – जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा


First Published on: July 9, 2019 10:44 AM
Exit mobile version