घरदेश-विदेशजम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या बडगामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

जम्मू–काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती या सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत – पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या तणावामुळे जम्मूतील अनेक ठिकाणी अशा लहानमोठ्या चकमकी सुरू आज पुन्हा एकदा जम्मूकाश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात चांदोरा भागात रविवारी सकळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. परिसराला सुरक्षा दलाने घेराव घातला असून तीन दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्येच चकमक सुरु असून एका दहशतवाद्याला यमसदनी पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

बडगामध्ये चकमक

बडगाम जिल्ह्यात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली होती. या शोध महिमे दरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलावर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या परिसरात अजूनही सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – जम्मू काश्मीरमध्ये चकमक; एका अतिरेकाला कंठस्नान

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -