Corona Vaccine: रशियापूर्वी आम्ही तयार केली कोरोनाची लस – चीनचा दावा

Corona Vaccine: रशियापूर्वी आम्ही तयार केली कोरोनाची लस – चीनचा दावा

एकीकडे रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) कोरोना लसीची पहिली बॅच येत्या दोन आठवड्यात बाजारात येईल. तर दुसरीकडे चीन रशियापूर्वी कोरोना लस तयार केलाचा दावा करत आहे. यासाठी चीन आपली कोरोना लस लवकरच जगासमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जगातील चीन पहिला असा देशा आहे ज्याने कोरोनाची लस तयार केली आहे, असे वारंवार श्रेय घेण्याचा प्रयत्न देखील चीन करत आहे.

जानेवारीपासून या चीनी कोरोना लसीसाठी पीपल्स लिबरेशन आर्मीची मेडिकल टीम काम करत आहे. आता या कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. पण चीन असा दावा करत आहे की, ‘रशिया किंवा जगातील इतर कोणत्याही देशापूर्वी कोरोना लस त्यांनी तयार केली होती आणि या लसीचे क्लिनिकल ट्रायल १६ मार्च झाले होते. तर दुसऱ्या टप्पातले क्लिनिकल ट्रायल १२ एप्रिलला पूर्ण झाले होते.’ पीपल्स लिबरेशन आर्मीचे मेजन जनरल शेन वी यांच्या नेतृत्वाखाली चीनी लस तयार होत आहे.

तसेच चीनने असा देखील दावा केला की, ‘वुहान शहरातील हुबेईत २६ जानेवारीपासूनच कोरोना लसीच्या टेस्टिंगच्या
कामाला सुरुवात झाली होती. त्यामुळे वुहानमध्ये टेस्टिंग लॅब तयार करण्यासाठी सुरुवात झाली होती आणि लवकरच या लॅबमध्ये रोज १ हजार लोकांची चाचणी घेण्यात येणार आहे.’

जेव्हा रशियाने कोरोना लस विकसित केल्याचे समोर आले तेव्हापासून चीन रशिया करत असलेले लसीवरचे काम त्यांनी एप्रिलमध्ये पूर्ण केले आहे, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी चीनने जागतिक संघटनेच्या हवाला देत म्हटले की, ‘एप्रिलमध्ये झालेले क्लिनिकल ट्रायल जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिले ट्रायल मानले होते. यासाठी चीनी तज्ज्ञांनी दिवस-रात्र बरेच संशोधन केले होते. वास्तविक, क्लिनिकल ट्रायलच्या अगोदर खूप संशोधन केले जाते, जेणेकरून ट्रायलमध्ये वाईट परिणाम दिसू नये. म्हणून तिसऱ्या टप्प्यातील ट्रायला इतका वेळ लागला.’

कोरोना संबंधित संशोधन आणि त्यापासून बचाव करण्यासाठी औषधे आणि लस तयार करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे शेन वी यांना दोन दिवसांपूर्वी ‘पीपल्स हिरो’चा नागरी सन्मान मिळाला आहे. लस ट्रायलच्या तिसर्‍या टप्प्याबद्दल माहिती देताना शेन म्हणाले की, ‘यानंतर ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होईल.’


हेही वाचा – जगातील पहिल्या कोरोना लसीचे उत्पादन सुरू, दोन आठवड्यात पहिली बॅच तयार होणार


 

First Published on: August 14, 2020 8:46 AM
Exit mobile version