चीन बनवणार कृत्रिम चंद्र

चीन बनवणार कृत्रिम चंद्र

प्रातिनिधिक फोटो

पृथ्वीवर जिवन निर्माण करण्यामध्ये चंद्राचा महत्वाचा वाटा आहे. आपला इतिहास, संस्कृती, परंपरा आणि जीवन शैलीवरही चंद्राचा प्रभाव पडतो. चीनच्या स्पेस एजन्सीकडून कृत्रिम चंद्र निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा चंद्र २०२० पर्यंत बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्राचा आकार मोठा असून जमिनीपासून तो ५०० किलोमीटर अंतरावर असणार आहे. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ३ लाख ८४ हजार ४०० किलोमीटर आहे. त्यामुळे फक्त ५०० किलोमीटर अंतरावरील या चंद्राच्या उर्जेमुळे येथील वीज वाचणार असल्याचे सांगितले जात आहे. या मोहीमेमुळे चीनला १७४ दशलक्ष डॉलर्सचा फायदा होणार असा दावा चीनकडून केला जात आहे.

काय आहे कृत्रिम चंद्राची मोहीम? 

कृत्रिम चंद्र हा खऱ्या चंद्रा सारखा असेल का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जमिनीपासून ५०० किलोमीटर अंतरावर एक आरसा बसवण्यात येईल. आरसा हा काचेचा नसून प्रकाशाचे परिवर्तन करणारा असेल. या आरशातून सुर्याचा प्रकाश चीन मधील विशिष्ठ भागात पडेल. हा आरसा पृथ्वी सोबतच भ्रमती करेल आणि पूर्णवेळ फक्त त्याच भागावर प्रकाश पाडेल. या ठिकाणी असलेले सोलाप पॅनलवर हा प्रकाश पडून वीज निर्मीती केली जाणार आहे. अशा प्रकारची मोहीम सुरु करणारा चीन हा पहिला देश ठरला आहे. या मोहीमेचा फायदा पर्यटन क्षेत्रालाही होणार आहे.

चीनला मिळाली रशियाची साथ

चीनने रशियाच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरु केली आहे. हा उपक्रम बऱ्याच वर्षापूर्वी रशियाने सुरु केला होता. रशियाने दोनवेळा कृत्रिम चंद्र सोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. म्हणून अखेर रशियन सरकारने या मोहीमेचा निधी बंद केला. त्यानंतर चीनद्वारे आता हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

काय होणार याचा परिणाम? 

या चंद्राचा प्राण्यांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे. सतत सुर्याचा प्रकाश पडल्यामुळे येथील नैसर्गिक समतोल बिघडेल. मानसांमध्ये समजूत असल्यामुळे त्यांच्या जीवनावर याचा कमी प्रमाणात परिणाम होईल. मात्र प्राण्यांना याची समज नसल्यामुळे त्यांच्यासाठी सभ्रमाची स्थिती निर्माण होईल. प्राण्यांच्या मेंदूमध्ये काही पेशी असतात त्या फक्त रात्रीच सक्रीय होतात. मात्र सतत सुर्य प्रकाश असल्यामुळे प्राण्यांना शिकारीसाठी निघता येणार नाही. याचा परिणाम निर्सगाला होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोयं.

First Published on: October 26, 2018 12:42 PM
Exit mobile version