Coronavirus Breaking: कोरोनाची लक्षणे दिसण्याआधी, त्याचा संसर्ग वेगाने पसरतो

Coronavirus Breaking: कोरोनाची लक्षणे दिसण्याआधी, त्याचा संसर्ग वेगाने पसरतो

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाला कसे थोपवायचे यावर अवघे जग काम करत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची नवनवीन उदाहरणे दररोज समोर येत आहेत. हा संसर्ग कोणकोणत्या पातळीवर वाढतो, याचा अभ्यास सध्या प्राधान्याने होत आहे. मात्र यात चिनी डॉक्टरांचा धक्कादायक दावा समोर आला आहे. ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे, मात्र कोणतीही लक्षणे दिसत नाही. अशा व्यक्तिच्या शरिरात सुप्तावस्थेत कोरोनचे विषाणू असतील तर ती व्यक्ती सर्वाधिक धोकादायक ठरते,  अशीच व्यक्ती मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग करते, असे म्हटले आहे.

हॉंगकॉंग विद्यापीठातील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी आणि संसर्ग नियंत्रण विभागातील डॉक्टरांनी कोविड -१९ च्या संसर्गावर संशोधन करत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले आणि हॉंगकॉंग हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या २३ रुग्णालयांचा अभ्यास करण्यात आला. या रुग्णांना जेव्हा सर्वात आधी कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा त्यांच्याकडून मोठ्या संख्येने इतरांना संसर्ग गेला. त्यानंतर जेव्हा त्यांना ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, या पातळीवर लक्षणे दिसून आली, त्यावेळी मात्र त्यांच्याकडून होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले, असे आढळून आले.

जोवर कोरोनाचा विषाणू हा नाक आणि घसा येथे प्रवेश करतो, त्यावेळी संबंधित रुग्ण मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरवत असतो. मात्र त्यानंतर जेंव्हा विषाणू फुफ्फुसात प्रवेश करतो तेंव्हा संबंधित रुग्णाला धोका वाढतो, मात्र त्याच्या पासून होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण कमी होत असते, असे या संशोधनात दिसून आले आहे. यावरून जगभरात कोरोनाचा संसर्ग हा कोरोना जेव्हा सुप्तावस्थेत असतो तेव्हाच जास्त प्रमाणात प्रसारित होत आहे.

First Published on: March 30, 2020 5:12 PM
Exit mobile version