सुरक्षा कर्मचार्‍यांने ४० विद्यार्थ्यांसह, शिक्षकांवर केला चाकूने हल्ला; तिघं गंभीर जखमी

सुरक्षा कर्मचार्‍यांने ४० विद्यार्थ्यांसह, शिक्षकांवर केला चाकूने हल्ला; तिघं गंभीर जखमी

चीनमध्ये सेंट्रल प्रायमरी शाळेत सुरक्षा कर्मचाऱ्याने चाकूने तब्बल ४० विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. सरकारी माध्यमाद्वारे देखील याची माहिती देण्यात आली आहे. चायना डेली या अधिकृत वृत्तपत्राने दिलेल्या एका वृत्तानुसार, गुआंग्सी जुआंग प्रांतातील एका शाळेत ही घटना घडली.

‘सीजीटीएन’ या वृत्तवाहिनीने असे सांगितले की, या झालेल्या हल्ल्यात तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. गुआंगसी जुआंग स्वायत्त प्रदेशातील वुझू शहरातील वांगफू टाऊन सेंट्रल प्रायमरी शाळेत गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली.

हाँगकाँगच्या ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ ने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेसंदर्भात वांगफू टाऊन सरकारने जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार, हल्लेखोर हा ५० वर्षीय शाळेचा सुरक्षा कर्मचारी आहे. प्रसिद्धी पत्रकानुसार, या घटनेत ४० जण जखमी झाले आहेत, त्यापैकी शाळेचे मुख्याध्यापक, एक सुरक्षा रक्षक आणि एक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ४० रुग्णवाहिकांना घटनास्थळी पाठविण्यात आले असून जखमींना वुझू या शहरातील शासकीय रुग्णालय आणि इतर आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

चीनमध्ये असंतुष्टांकडून चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये बर्‍याच वर्षांत वाढ झाली आहे. या असंतुष्ट हल्लेखोरांनी त्यांचा राग रोखण्यासाठी मुख्यतः सार्वजनिक वाहतुकी व्यतिरिक्त गार्डन आणि प्राथमिक शाळांना त्यांचे लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे.


केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूसारखीच आणखी एक कोचीतील घटना उघडकीस
First Published on: June 4, 2020 4:54 PM
Exit mobile version