घरदेश-विदेशकेरळमधील हत्तीणीच्या मृत्यूसारखीच आणखी एक कोचीतील घटना उघडकीस

केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूसारखीच आणखी एक कोचीतील घटना उघडकीस

Subscribe

केरळमधील गरोदर हत्तीणीच्या मृत्यूची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्यानंतर अशीच आणखी एका हत्तीणीच्या मृत्यूची माहिती आता समोर आली आहे. कोचीतील कोल्लम तालुक्यात महिनाभरापूर्वी तोंडाला इजा झाल्यामुळे एका हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. वन अधिकाऱ्याने एप्रिल महिन्यात कोल्लम जिल्ह्यातील पठनपुरम येथे जंगल परिसरात अशाच पद्धतीने जखमी हत्तीण सापडल्याची माहिती पीटीआयला दिली. त्या हत्तीणीचा जबडा पूर्णपणे जखमी झाला होता. काहीतरी खाऊन तिची ही अवस्था झाल्याचा अंदाज लावला जात होता. तिच्यावर वनविभागाकडून उपचारदेखील करण्यात आले. मात्र काही तासांनी त्या हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा तोंडांच्या जखमेसारखे प्रकरण समोर आले आहे.

हेही वाचा – जॅकपॉट लागला ना भाऊ; ऐन कोरोनाच्या संकटात सापडली सोन्याची खाण!

- Advertisement -

केरळमध्ये गरोदर हत्तीणीचा मृत्यू 

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. ही हत्तीणी भुकेने त्रस्त झाली होती. त्यामुळे ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. त्याच दरम्यान, काही स्थानिक लोकांनी तिला अननसाद्वारे फाटाके खायला घातले. भुकेने व्याकुळ झालेल्या हत्तीणीने लोकांवर विश्वास ठेवत ते अननस खाल्ले आणि थोड्याच वेळात तिच्या पोटात फटाके फुटले. यातच गर्भाशयात वाढणार्‍या मुलासह तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्याने ही वेदनादायक घटना सोशल मीडियावर पोस्ट केली आणि लगेचच त्या हत्तीणीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोक चांगलेच संतापले. यासंबंधी वन विभागाने माहिती दिली की, हत्तीणीचे पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यानंतर तपास करणे अधिक सोपे जाईल. तसेच तिच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -