चीनच्या राजदूताचा इस्त्राइलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू

चीनच्या राजदूताचा इस्त्राइलमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू

इस्त्राइलमध्ये चीनचे राजदूत डू वेई (वय ५८) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या हर्टजलिया येथील घरामध्ये त्याचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. इस्त्राइलचे परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. इस्त्राइलमध्ये सध्या नव्या सरकारच्या शपथविधी वरून राजकीय खलबत सुरू आहेत. त्यादरम्यान, ही धक्कादायक बातमी समोर आली. पोलीस या घटनेचा तपास करत असून त्यांच्या घरापासून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. मात्र चीनच्या राजदूताने अद्याप यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

हेही वाचा – देशातील कोरोना बाधितांचा आकडा ९० हजाराच्या वर, गाव-खेड्यातही पोहोचला कोरोना

फेब्रुवारीमध्ये इस्त्राइलला नियुक्ती 

इस्त्राइलच्या प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चीनचे राजदूत डू वेई यांच्या घरामध्ये हिंसाचार झाल्याचे कोणतेही चिन्ह आढळून आलेले नाही. त्यांचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र अद्याप मृत्यूचे ठोस कारण समोर आलेले नाही. घरातील बेडवर त्यांचा मृतदेह आढळून आला. झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांना इस्त्राइलचे राजदूत पदावर नियुक्त करण्यात आले होते.

दरम्यान, कोरोना रूग्णांचे प्रारंभिक नमुने नष्ट केल्याचे चीनने मान्य केले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे वैद्यकीय अधिकारी लियू डेंगफेंग यांनी शुक्रवारी मान्य केले की चीनी सरकारने ३ जानेवारी रोजी अनधिकृत लॅबमधून कोरोना विषाणूचे नमुने नष्ट करण्याचा आदेश जारी केला होता. जैविक सुरक्षा कारणास्तव असे करणे आवश्यक होते, असे कारण दिले आहे.

First Published on: May 17, 2020 3:48 PM
Exit mobile version