चीनी नागरिकाने घेतला आधाराकार्डाचा आधार

चीनी नागरिकाने घेतला आधाराकार्डाचा आधार

प्रातिनीधीक फोटो

हॉटेलमध्ये चेक ईन करताना एका चीनी नागरिकाने भारतीय आधारकार्डाचा वापर केल्याची घटना उत्तर बंगाल येथील जलपाईगुडी येथे घडली. एका नेपाळी नागरिकाने त्याला आधारकार्ड मिळवून दिले असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली. या प्रकरणी तीन लोकांना पोलिसांनी अटक केले आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

अटक केलेल्या चीनी नागरिकाकडे स्वःतचा पासपोर्ट असला तरीही त्याच्याकडील अन्य कागदपत्रे बनावट होती. या कागदपत्रांच्या आधारावर तो मागील काही दिवसांपासून हॉटेलमध्ये राहत होता. त्याच्या जवळून अन्य बनावट कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. दरम्यान अटकेत असलेल्या गणेश आणि बिपूल या दोघांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. तर तीसरा चीनी नागरिक ये व्हँग याची प्रकृती बिघडली असल्याने त्याला न्यायालयात हजर करता आले नाही.

भारत – चीन देशांमध्ये गेल्या काही काळात डोकलामवरुन तणावाचे संबंध निर्माण झाले होते. यामुळे भारतात येणाऱ्या चीनी नागरिकांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारावर भारतात चीनी नगरिकांनी प्रवेश केल्याच्या या घटनेची गंभीर दखल घेतली जात असून या प्रकरणी आंतरराष्ट्रीय दूतावसाचीही मदत घेतली जाणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावार चौकशी सुरु असल्याने याबाबत अधिक माहिती देण्याचे पोलिसांनी टाळले आहे.

“बनवाट आधाराकार्डाचा वापर केल्याप्रकरणी चीनी नागरिक ये व्हँग, नेपाळी नागरिक गणेश भट्टाराय आणि स्थानिक व्यापारी बिपूल अग्रवाल या तीघांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बनवल्या प्रकरणी या तीघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.” सिलीगुडी पोलीस आयुक्त, सुनिलकुमार चौधरी

First Published on: June 19, 2018 8:03 PM
Exit mobile version