चीनला अखेर उपरती; शेन्झेनमध्ये वन्यजीव खाण्यावर बंदी लागू!

चीनला अखेर उपरती; शेन्झेनमध्ये वन्यजीव खाण्यावर बंदी लागू!

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला असून लाखोंना कोरोनाची लागण झाली आहे. पण या कोरोनाला सुरुवात ज्यामुळे झाली, ते वन्यजीव मांस खाण्यावर बंदी घालण्याची मागणी चीनमध्ये जोर धरू लागली. काही भागांमध्ये ही बंदी घालण्याविषयी स्थानिक सरकारांनी कायदा करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली असून शेन्झेन हा चीनमधला पहिला प्रांत ठरला आहे की जिथे वन्यजीवांचं मांस खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. १ एप्रिल रोजी शेन्झेनमधल्या स्थानिक असेंम्ब्लीमध्ये हा कायदा पारित करण्यात आला आहे. यानुसार, नवीन कायदा १ मेपासून लागू करण्यात येणार आहे. याआधी बिजिंगमध्ये देखील अशाच प्रकारच्या कायद्याला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चीनचं सकारात्मक पाऊल

जंगली वटवाघुळाच्या माध्यमातून कोरोना चीनमध्ये पसरल्याचं सांगितलं जातं. वटवाघुळाचं मांस हा चीनी खाद्यसंस्कृतीमधला पदार्थ आहे. मात्र, त्यातूनच कोरोनाच्या व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर चीनच्या या विचित्र खाद्यसंस्कृतीवर जगभरातून टीका करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर चीनमधल्या एका प्रांताने घेतलेला हा निर्णय सकारात्मक पाऊल मानलं जात आहे. या वन्यजीव प्राण्यांमध्ये कुत्रे आणि मांजरींचा देखील समावेश आहे. शेन्झेंगची लोकसंख्या साधारणपणे १० लाख असून अनेक प्राणीमित्र संघटनांनी अशा प्रकारच्या मांस विक्री आणि खाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

वादग्रस्त युलिन डॉग मीट फेस्टिव्हल

चीनच्या खाद्यसंस्कृतीची प्रचिती देणारा तिथला प्रसिद्ध वार्षिक युलिन डॉग मीट फेस्टिव्हल अनेकदा वादात सापडला आहे. आपल्याकडे भरणाऱ्या खाद्य महोत्सवाप्रमाणेच हा महोत्सव भरवला जातो. यामध्ये दरवर्षी हजारो कुत्र्यांची कत्तल करून त्यांचं मांस शिजवून खाल्लं जातं. कुत्र्यांसोबतच साप, बेडूक, कासवांचं मांस देखील चीनमध्ये चवीने खाल्ल जातं.


हेही वाचा – चीनमध्ये आता वन्य प्राण्यांना खाल्ल्यास ठरेल गुन्हा
First Published on: April 2, 2020 10:26 AM
Exit mobile version