चीनचे भारताला फुकटचे सल्ले, म्हणे ‘अमेरिका तुम्हाला भडकवतेय’!

चीनचे भारताला फुकटचे सल्ले, म्हणे ‘अमेरिका तुम्हाला भडकवतेय’!

...तर आम्ही मोदींना मदत करु - चीन

भारताने ५८ चीनी APP बंद केल्यानंतर चीनी मिडीया भारताला सल्ले देत आहे. चीनचा सरकारी पेपर ग्लोबल टाईम्सने एका लेखात भारताला अमेरिकेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. लेखात म्हटलं आहे की जर भारत अमेरिकेपासून दूर राहिला तरच त्याचा विकास होईल. अमेरिका भारतीय लोकांमध्ये केवळ चीन विरूध्द राग भरण्याचे काम करत आहे. खरतर अमेरिका भारताला अजिबात मदत करण्यात इच्छुक नाहीये. अमेरिका चीनला थांबवण्यासाठी भारताचा केवळ वापर करत आहे. चीनी APP बंद केल्यामुळे भारताचेचं नुकसान झाले आहे कारण या App मधून भारतीय लोकांना रोजगार मिळत होता.

चीनी APP मधून भारतात रोजगार निर्मीती करण्यात येत होती आणि रोजगार निर्मीती ही आर्थिक विकासासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे सल्ला देताना चीनेन म्हटलं आहे की, भारताने चीनबरोबरचे संबंध खराब केले तरी अमेरिका त्याची भरपाई करू शकाणार नाही. कारण अमेरिका आणि चीन यांच्यामधले संबंध गेले अनेक वर्ष खराब आहेत आणि अमेरिकेलाच ते चांगले व्हायला नको आहेत.

या सरकारी पेपरात अमेरिके विरोधात चीनने लिहीले आहे की, अमेरिकेला जगात शांतता नको आहे. त्यांना सतत भांडणं करायची आहेत. पुढे लेखात म्हटले आहे की, भारत आणि चीन सीमावाद हा शांतते सोडवणं यात दोन्ही देशांचे हित आहे. दोन्ही देश यासाठी प्रयत्न करत असताना अमेरिका मात्र भारतीय लोकांचा भडकवण्याचा प्रयत्न करत आहे.

First Published on: July 10, 2020 4:06 PM
Exit mobile version