कोरोनापासून वाचण्यासाठी पाणी पिणे पडले महागात, थेट ICU गाठले

कोरोनापासून वाचण्यासाठी पाणी पिणे पडले महागात, थेट ICU गाठले

कोरोनापासून वाचण्यासाठी पाणी पिणे पडले महागात, थेट ICU गाठले

पाणी हे जिवन जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. पण हेच पाणी आपला जीवही घेऊ शकतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. हीच गोष्ट पाण्याच्या बाबतीतही लागू होते. इग्लंडमध्ये राहणाऱ्या एका तरूणाचा अति पाण्याचे सेवन केल्याने गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागले. जास्त पाणी पिल्यांने तरूणाला थेट ICUमध्ये भरती करावे लागले.

इग्लंडच्या ब्रिस्टल शहरात राहणाऱ्या सिविल सर्वन्ट ल्युक विलियमस या तरूणासोबत एक भयानक प्रसंग घडला आहे. ३४ वर्षांचा ल्युक हा आपल्या परिवारासोबत राहत होता. ब्रिटनमध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन लागला तेव्हा ल्युकला असे वाटले की तो कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी पाण्याचे प्रमाण वाढवावे असे त्याला वाटले. पाण्याचे प्रमाण वाढवल्याने कोरोनावर आपण मात करू शकतो असे त्याला वाटले. म्हणून ल्युकने दररोज ५-६ लीटर पाणी पिण्यास सुरूवात केली. हेच पाणी पिणे त्याच्या जिवावर उठेल असे त्याला वाटले नव्हते.

सामान्यपणे लोक २-३ लीटर पाणी दिवसाला पितात काही जण याला अपवादही आहेत. ल्युक याने ५-६ लीटर पाणी पिण्यास सुरूवात केल्याने त्याच्या शरीरातील सोडियमचा स्थर झपाट्याने कमी होऊ लागला. शरीरातील सोडिअमचे प्रमाण कमी झाल्याने ल्युक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला.

ल्युकच्या पत्नीने सांगितल्या प्रमाणे तो संध्याकाळी आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला. बाथरूममधून बाहेर येताच चक्कर येऊन खाली पडला. ल्युकची पत्नी लॉकडाऊनमुळे शेजाऱ्यांचीही मदत घेऊ शकत नव्हती. रूग्णवाहिका येई पर्यंत ल्युक ४५ मिनिटे बेशुद्ध अवस्थेत पडून होता. ल्युक काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. त्यामुळे मी ही हैराण झाले होते.

डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना कळले की जास्त पाणी पिल्याने ल्युकच्या शरीरातील सॉल्ट लेवल खूप कमी झाली. त्यामुळे ल्युकला अशा गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्याला २-३ दिवस Icuमध्ये ठेवण्यात आले होते. हॉस्पिटलचा स्टाफ खूप चांगला असल्याने त्यांनी ल्युकची योग्य काळजी घेतली. ल्युक आता त्याच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत असल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले आहे.

 

First Published on: December 30, 2020 10:43 PM
Exit mobile version