लोकप्रिय होतेय झुरळाचे दूध

लोकप्रिय होतेय झुरळाचे दूध

लोकप्रिय होतेय झुरळाचे दूध

झुरळ जरी दिसले तरी आपल्या अंगावर काटा येतो. मग अशा झुरळांपासून बनवण्यात आलेले दूध प्यायचे… काय? कल्पनाच करवत नाही ना. पण हे सत्य आहे. झुरळाच्या दूधाचा २०१६ साली शोध लावण्यात आला. आता हे सुपरफूड म्हणून प्रसिद्ध झाले आहे. जगातील अनेक देशांमध्ये प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून हे दूध सर्रास प्यायले जात आहे.

झुरळाचे दूध प्रथिनांनी संपन्न

२०१६ साली भारतातील इन्स्टीट्यूट फॉर स्टेम सेल बायोलॉजी अँड रिजनरेटिव्ह मेडिसिनने या पॅसिफिक महासागरातील बेटांवर आढळणाऱ्या झुरळाचे दूध आगामी काळात सुपरफूड म्हणून नावारुपाला येईल असा दावा केला होताच. या झुरळांमध्ये स्फटिक किंवा पावडरीच्या स्वरुपात प्रथिनयुक्त पदार्थ असतात. ही झुरळे प्रामुख्याने हवाई बेटांवर आढळतात. इतर झुरळांप्रमाणे अंडी न देता ते पिलांना थेट जन्म देतात. त्यानंतर या स्फटिकरुपी दुधाचा वापर करुन ते आपल्या पिलांचे पोषण करतात. हे दूध आपल्या रोजच्या वापरातल्या दुधापेक्षा तीनपट प्रथिनांनी समृद्ध असते.

दूधापासून आईस्क्रिमही बनवणार

हे स्फटिक म्हणजे एक पूर्णान्नच आहे. त्यांच्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि शर्करा असते. जर प्रथिनांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये मानवाला आवश्यक असणारी सर्व अमायनो आम्ले असतात अशी माहिती संचारी बॅनर्जी या संशोधकांनी याबाबत दिली आहे. झुरळातून स्रवणाऱ्या या पदार्थाचा वापर करुन त्यांच्यापासून आईस्क्रीमसारखी उत्पादने तयार करण्याचा विचार काही कंपन्यांचा आहे. दक्षिण आफ्रिकेतील गोर्मेट ग्रब ही कंपनी या दुधाची एन्टोमिल्क नावाने विक्री करत आहे.

First Published on: May 30, 2018 11:09 AM
Exit mobile version