कोरोना संदर्भात चीनच्या अध्यक्षांविरोधात बिहारमध्ये खटला दाखल; मोदी, ट्रम्प यांना बनवलं साक्षीदार!

कोरोना संदर्भात चीनच्या अध्यक्षांविरोधात बिहारमध्ये खटला दाखल; मोदी, ट्रम्प यांना बनवलं साक्षीदार!

Appsच्या बंदीनंतर चीनच्या व्यापार युद्धाच्या धमक्या, म्हणे...

देशात कोरोना महामारीच संकट वाढताना दिसत आहे. या जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे देशात ८ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. तसेच जगभरातील अनेक देश कोरोनाच्या प्रसाराला चीन जबाबदार असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान बिहारच्या बेतिया येथील एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांच्या विरोधात वकील आणि याचिकाकर्ते मुराद अली यांनी बिहारमधील बेतिया न्यायालयात खटला दाखल केला आहे. चीनने आणि जागतिक आरोग्य संघटनेने मिळून संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रसार केला आहे, असा आरोप या याचिकेत केला आहे.

मुराद अली म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक मीडियावरील आलेल्या बातम्या आणि काही कागदपत्र पुराव्याच्या स्वरुपात आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साक्षीदार म्हणून नावे देण्यात आली आहेत. या प्रकरणी कोर्ट १८ जून रोजी सुनवाणी करणार आहे. आरोपींवर आईपीसीचे कलम २६९, २७०, २७१, ३०२, ३०७, ५०४ आणि १०२ बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ८६ हजार ७८६वर पोहोचला आहे. तर ८ हजार १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ लाख ४० हजार ८८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचा १३५० कोटींचा ऐवज जप्त; ईडीची मोठी कारवाई


 

First Published on: June 10, 2020 11:07 PM
Exit mobile version