सोनिया गांधींच्या ईडी चौकशीच्या दिवशी काँग्रेस करणार तीव्र आंदोलन; आज पक्षाची महत्त्वाची बैठक

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीच्या दिवशी काँग्रेस करणार तीव्र आंदोलन; आज पक्षाची महत्त्वाची बैठक

बहुचर्चित नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने समन्स बजावल्याने केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने देशभरात तीव्र आंदोलन करण्याची तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ईडीने 21 जुलै रोजी काँग्रेस अध्यक्षांना समन्स बजावला असून चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहे, त्याच दिवशी पक्ष देशभरात आंदोलन करणार आहे.

सोनिया गांधी यांना 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीने यापूर्वी जूनमध्ये राहुल गांधी यांची पाच दिवस चौकशी केली होती. त्यावेळी ईडी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी देशभरात तीव्र निदर्शने केली होती.

दरम्यान काँग्रसने आजही पुन्हा पक्षाची एक महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाचे सर्व सरचिटणीस, राज्यांचे प्रभारी, पीससी प्रमुख भारत जोडो यात्रा आणि काँग्रेसच्या इतर संघटानात्मक कार्यक्रमांवर विचार करतील. या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून

संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत आहे, त्यामुळे काँग्रेसचे खासदार संसदेच्या आवारातही केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारच्या बैठकीनंतर सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या शेरणी आहेत, त्या अशा गोष्टींना घाबरत नाहीत. त्यांना अनेकदा अशा गोष्टींचा सामना करावा लागला आहे. त्या ईडी कार्यालयात जाऊन या सरकारला सामोरे जाणार आहे.

ईडीने राहुल, खर्गे आणि बन्सल यांची केली चौकशी

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, खर्गे आणि माजी केंद्रीय मंत्री पवन बन्सल यांची चौकशी केली आहे. राहुल गांधी यांची जूनमध्ये अनेकवेळा आणि अनेक तास चौकशी करण्यात आली. याप्रकरणी केंद्रावर सूडाचे राजकारण केल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. राहुल गांधी यांच्या चौकशीदरम्यान काँग्रेसने जोरदार आंदोलन केले होते. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात घुसून दिल्ली पोलिसांनी नेत्यांविरुद्ध गैरवर्तन केल्याचा आरोप पक्षाने केला होता.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल हेराल्ड प्रकरणातही पक्षाने जनतेमध्ये पॅम्प्लेट वाटप करण्याची योजना आखली आहे. यासाठी पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : पावनखिंडवर दारू पिऊन धिंगाणा, शिवभक्तांनी दिला चोप; व्हिडीओ व्हायरल


First Published on: July 14, 2022 9:30 AM
Exit mobile version