‘त्या’ आंदोलनानंतर पीयूष गोयल यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘…ब्लॅक मॅजिक करतंय’

‘त्या’ आंदोलनानंतर पीयूष गोयल यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘…ब्लॅक मॅजिक करतंय’

‘काँग्रेस सध्या खूपच निराश झाली आहे. भाजपाविरोधात कारवाया करताना काँग्रेसला आता ब्लॅकमॅजिक करावे लागते आहे’, अशा शब्दांत भाजपा नेते पियुष गोयल यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने आज संसद भवन परिसरात काळे कपडे परिधान करत आंदोलन केले. या आंदोलनानंतर भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. (Congress Is Doing Black Magic Against Bjp Serious Accusation By Piyush Goyal)

नेमके काय म्हणाले पियूष गोयल?

“काँग्रेसनं निषेधासाठी काळे कपडे घालून आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. पण आपण काळे कपडे पाहिलेत का? काँग्रेस सध्या खूपच निराश झाली आहे. त्यांना आता ब्लॅक मॅजिकची मदत घ्यावी लागत आहे. काँग्रेसच्या आंदोलनामागील हेतू त्यांना ओबीसींचा अपमान करायचा आहे. ते मनातून ओबीसींच्या विरोधात आहेत. राहुल गांधींना स्वतःला कायद्याच्यावर असल्याचे समजण्याचा अधिकार नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर आजवर 12 जणांची खासदारकी रद्द झाली आहे. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी त्यांना माफी मागून विषय संपवण्याच सल्ला दिला होता. पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही, यातून त्यांचा अरोगन्स दिसून येतो”, असेही पियूष गोयल म्हणाले.


हेही वाचा – सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक, काँग्रेसच्या डिनर पार्टीवर बहिष्कार

First Published on: March 27, 2023 7:31 PM
Exit mobile version