संविधानाची सर्कस केली, तर लोकशाहीला द्रौपदी; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

संविधानाची सर्कस केली, तर लोकशाहीला द्रौपदी; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

आमदारांच्या घोडेबाजाराच्या आरोपानंतर राजस्थानमध्ये राजकीय नाट्याला सुरुवात झाली. आमदार सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर सुरु झालेला सत्तासंघर्ष अद्याप सुरु आहे. दरम्यान, या सत्तानाट्यावरून काँग्रेसचे नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने संविधानाची सर्कस केल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.

सुरजेवाला यांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. “भाजपने संविधानाची सर्कस केली आहे. त्यांनी लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण करणाऱ्या कौरवांचं जे झालं होतं तेच राजस्थानची कृष्णरूपी जनता भाजपच्या कटाचं करेल. आता न्याय मिळेल,” असं सुरजेवाला म्हटलं आहे.

“जर काँग्रेसकडे बहुमत आहे, सभागृहदेखील भरवायचं आहे, तसंच हा अधिकार सरकारचा आहे तेव्हा भाजपवाले आणि त्यांचे अनुयायी पाठ दाखवून पळून का जात आहेत. दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांना विधिमंडळात बहुमताची भीती का वाटत आहे?,” असा सवालही सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे केला आहे.

न्यायालयानंतर राजभवनाकडून गेहलोत यांना धक्का

राजस्थानच्या राजकीय पेचप्रसंगात आता राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री यांच्यात युध्द सुरू झालं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विधानसभेचे अधिवेशन बोलविण्याचे आवाहन केलं आहे. परंतु राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही. कोरोना संकटाचा संदर्भ देत अधिवेशन बोलावण्यावर राज्यपाल कलराज मिश्रा यांनी नकार दिला आहे. त्यानंतर राजभवनामध्ये सर्व आमदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करत आहेत.


हेही वाचा – निवडणूक आयोगाने भाजपशी संबंधित कंपनीला काम दिल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप


 

First Published on: July 24, 2020 3:58 PM
Exit mobile version