आता काँग्रेसच्या मनीष तिवारींच्या पुस्तकावरुन नवा वाद, २६/११ हल्ल्याच्या घटनेवरुन भाजपचा हल्लाबोल

आता काँग्रेसच्या मनीष तिवारींच्या पुस्तकावरुन नवा वाद, २६/११ हल्ल्याच्या घटनेवरुन भाजपचा हल्लाबोल

सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. वास्तविक मनीष तिवारी यांनी त्यांच्या ‘१० फ्लॅश पॉइंट्स, २० इयर्स’ (10 Flash Points, 20 Years) या पुस्तकात यूपीए सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या नव्या पुस्तकात तिवारी यांनी मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कोणतीही कारवाई न केल्याबद्दल तत्कालीन यूपीए सरकारला कमकुवत सरकार म्हटलं आहे.

तिवारी यांच्या पुस्तकावरून झालेल्या वादावरुन भाजपला संधी मिळाली असून त्यांनी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी यूपीए सरकारचा हेतू वाईट असल्याचं म्हणत तत्कालीन एअर चीफ मार्शल म्हणाले होते की, आमचे हवाई दल प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे, परंतु कारवाईला परवानगी देण्यात आली नाही, असं भाटीया म्हणाले. काँग्रेसने या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावं. तसंच, काँग्रेसने शूर जवानांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत यूपीए सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलं की, “मनीष तिवारी यांच्या पुस्तकात नमूद केलेल्या वस्तुस्थितीनंतर, काँग्रेस सरकार निरुपयोगी आणि त्यांना देशाच्या अखंडतेची काळजीही नव्हती.” पुढे ते म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मुद्द्यावर त्यांना भारताच्या अखंडतेची काळजीही नव्हती. प्रत्येक भारतीय असे म्हणत होता, भाजपही तेच म्हणत होता. आज काँग्रेसच्या राजवटीत मंत्री राहिलेल्या मनीष तिवारी यांनी आपल्या सरकारने राष्ट्रीय सुरक्षा पणाला लावल्याचे मान्य केलं आहे, असं गौरव भाटिया यांनी म्हटलं.

 

First Published on: November 23, 2021 4:36 PM
Exit mobile version