कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी दुसऱ्यांदा कोरोनाबाधित

कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी दुसऱ्यांदा कोरोनाबाधित

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना कोरोनाची (Covid-19) लागण झाली आहे. प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. याआधीही ३ जून रोजी प्रियांका गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या. (congress leader priyanka gandhi second time tested positive for coronavirus)

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रियांका गांधी यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. “आज कोविड चाचणी (पुन्हा) पॉझिटिव्ह आली. होम आयसोलेशनमध्ये राहणार असून सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करिन”, असे प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, कॉंग्रेसने (Congress) महागाई, बेरोजगारीविरोधात तसेच ईडीच्या कारवायांविरोधात देशव्यापी आंदोलन केले होते. दिल्लीमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी काळे कपडे परिधान करत महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारचा निषेध केला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी मोर्च्यासाठी काँग्रेसला परवानगी दिली नसतानाही हे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे परिसरात जमावबंदी लागू करत राहुल गांधी यांना ताब्यात घेतले तर प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले होते.

राहुल गांधीही आजारी

कॉंग्रेस नेते राहुल गांधीही आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. आजारी असल्याने त्यांचा आजचा राजस्थान दौरा रद्द करण्यात आला आहे.


हेही वाचा – ‘फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली; शिवसेनेची टीका

First Published on: August 10, 2022 9:41 AM
Exit mobile version