काँग्रेस आमदाराने महिला IPS अधिकाऱ्याची काढली लायकी!

काँग्रेस आमदाराने महिला IPS अधिकाऱ्याची काढली लायकी!

राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये कायमच तणाव निर्माण होत असल्याचं अनेक प्रकरणांमधून दिसलं आहे. दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये भाजप आमदार आर. एम. अगरवाल यांनी महिला आयपीएस अधिकारी चारू निगम यांच्याशी केलेल्या असभ्य वर्तनामुळे चारू यांना रडू कोसळल्याची दृश्य आख्ख्या भारताने पाहिली आहेत. त्यातच आता असंच एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. यात छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या आमदाराने महिला आयपीएस अधिकाऱ्याला मोठ्या जमावासमोर थेट धमकी दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून संबंधित महिला आमदारावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे. त्याचसोबत सदर महिला आयपीएस अधिकाऱ्याने दाखवलेल्या बाणेदारपणाचं कौतुक होत आहे.

नक्की झालं काय?

छत्तीसगडच्या बलोदाबादमध्ये एका मुद्द्यावर बुधवारी आंदोलन सुरू होतं. एका बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात मजुराचा मृत्यू ओढवला होता. त्यामुळे आंदोलनासाठी बसलेल्या लोकांमध्ये स्थानिक काँग्रेसच्या आमदार शकुंतला साहु या देखील आपल्या कार्यकर्त्यांसोबत सहभागी झाल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे प्रशिक्षणार्थी महिला आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा दाखल झाल्या. मात्र, यादरम्यान झालेल्या गोंधळामध्ये पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. त्यावरून शकुंतला साहु आणि अंकिता शर्मा यांच्यात देखील काही काळ वाद झाला.

काय म्हणाल्या आमदार मॅडम?

दरम्यान, शकुंतला साहु यांनी अंकिता शर्मा यांच्यासोबत बोलताना त्यांना थेट धमकीच देऊन टाकली. ‘आप हमसे ऐसे मत बोलिये, नहीं तो आपकी औकात दिखा देंगे. आप मेरे आदमी को क्यों बोली?’ असं म्हणत साहु यांनी अंकिता शर्मा यांना धमकावलं. त्यावर अंकिता शर्मा यांनी देखील त्यांना पोलिसी इंगा दाखवला. ‘आप मेरी औकात के बारे में मत बोलिये. मैने सिर्फ इतना कहा के मेरे आदमी को चोट नहीं पहुंचनी चाहिये. और आप मेरी औकात के बारे में बोल रही है, आप जिसे चाहे उसे फोन करके मेरी औकात पूछ लिजिये’, असं म्हणत शर्मा यांनी साहुंना थेट सुनावलं.


Video : सारा -कार्तिकच्या किसींग सीनला सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री, व्हीडिओ व्हायरल!
First Published on: February 14, 2020 8:20 PM
Exit mobile version