UP Assembly Election: युपी विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकिटं महिलांना देणार, प्रियंका गांधींचा मोठा निर्णय

UP Assembly Election: युपी विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकिटं महिलांना देणार, प्रियंका गांधींचा मोठा निर्णय

UP Assembly Election: युपी विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकिटं महिलांना देणार, प्रियंका गांधींचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून ४० टक्के तिकिटं ही महिलांना देण्यात येणार आहेत. काँग्रेस सचिव प्रियंका गांधी यांनी महिलांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून ४० टक्के जागांवर महिला उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेले असताना काँग्रेसकडून घेण्यात आलेला मोठा निर्णय काँग्रेसच्या हिताचा ठरेल का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस सचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकिटं महिलांना देणार असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने यासाठी अर्ज मागवले आहेत. १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की जर मला वाटतं तसे करता आले असते तर मी ५० टक्के तिकिटं महिलांना दिली असती. कारण उत्तर प्रदेशमध्ये आरक्षण वाढल्यास देशही वाढेल. ‘लडकी हूं, लड सकती हूं’ हे काँग्रेसचे घोषवाक्य असल्याचेही प्रियंका गांधी यांनी सांगितले आहे.

उन्नावमधील मुलीवर झालेल्या अन्यायामुळे हा निर्णय घेतला असल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले. पिडित मुलीला जाळण्यात आले. तसेच हा निर्णय हाथरसरच्या त्या मुलीसाठी आहे जिला अद्याप न्याय मिळाला नाही. लखीमपुरमधील त्या मुलीसाठी हा निर्णय आहे. जीची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. हा निर्णय उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी त्या मुलीसाठी आहे ज्यांना युपीला पुढे नेण्याची इच्छा आहे.

सध्या सत्तेमध्ये वैर निर्माण झालं असून हे वातावारण आता बदलण्याची वेळ आली आहे. मला वाटते की, महिला हे चांगल्या प्रकारे करु शकतात. जर देशाला जातिवाद, धर्म, राजकारण यातून बाहेर काढायचे असेल तर महिलांना राजकारणात सक्रिय व्हावेच लागेल असे प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : आजही उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, केरळमध्ये पूर-पावसामुळे ३८ जणांचा मृत्यू; जाणून घ्या परिस्थिती


 

First Published on: October 19, 2021 3:16 PM
Exit mobile version