बाहेर सिंहासारखे बोलतात पण चालतात उंदरासारखे, खर्गेंचा मोदी सरकारला टोला

बाहेर सिंहासारखे बोलतात पण चालतात उंदरासारखे, खर्गेंचा मोदी सरकारला टोला

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपला जीव दिला पण आपण काय केले?, आपल्या घरातील कुणी देशासाठी आपले बलिदान दिले आहे का?, बाहेर सिंहासारखे बोलतात पण चालतात उंदरासारखे, असं म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

सीमेवर आपल्या २० जवानांना हौतात्म्य आलं अन् मोदीजी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची १८ वेळा भेट झाली.
आपण भेट आहेत. तसेच आम्ही चर्चेची मागणी करतोय पण तुम्ही चर्चा करायला तयार नाहीयेत. राजनाथ सिंहांनी एक पानाचे निवेदन दिले आणि ते निघून गेले. आम्हालाही सांगा , देशालाही सांगा की नेमकं काय सुरू आहे?, तुमचं सरकार काय करतंय?, कारण तुम्ही बाहेर सिंहाप्रमाणे बोलतात पण उंदरासारखे चालतात, असा टोला मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला आहे.

मल्लिकार्जुन खर्गेंनी गुजरातमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित केलं होतं. तेव्हा मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली होती. तुम्ही १०० डोकी असलेल्या रावणासारखे आहेत का?, अशी टीका खर्गेंनी मोदींवर केली होती. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खर्गेंना प्रत्युत्तर दिलं होतं. मोदींच्या अपमानाला गुजरातची जनताच उत्तर देईल, असा पलटवार अमित शाह यांनी मल्लिकार्जुन खर्गेंवर केला होता. मात्र, पुन्हा एकदा खर्गेंनी वादग्रस्त वक्तव्य करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे भाजपची काय भूमिका असेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : मोदींच्या अपमानाला गुजरातची जनताच.., अमित शाहांचा खर्गेंवर पलटवार


 

First Published on: December 19, 2022 9:45 PM
Exit mobile version