काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पुन्हा कोरोनाची लागण

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पुन्हा कोरोनाची लागण

काँग्रेसच्या(congress) अध्यक्षा सोनिया गांधी(soniya gandhi) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह(covid test) आली आहे. त्यामुळे सोनिया गांधींना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भांत माहिती काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी दिली आहे. यता संदर्भांत माहिती देताना जयराम रमेश म्हणाले की काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचबरोबर सरकारी नियमांचं पालन करत सोनिया गांधी सध्या विलगीकरण कक्षात आहेत. सोनिया गांधी यांना कोरोना होण्यापूर्वी तीन दिवस सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी(priyanka gandhi) यांना सुद्धा कोरोनची लागण झाली आहे.

हे ही वाह – Rahul Gandhi यांचा लंडनहून अचानक Sonia Gandhi यांना फोन; कोणाशी केली बातचीत?

सोनिया गांधी(soniya gandhi) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्विटवरच्या माध्यमातून दिली. दरम्यान या पूर्वी २ जून रोजी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सोनिया गांधी दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात उपचार घेत होत्या. सोनिया गांधी दिल्लीतील रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चोकशी साठी ईडीने(ED) समन्स पाठवले होते. त्यांनतर सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्या ईडीच्या कार्यलयात चौकशीसाठी हजर राहिल्या होत्या. ईडीच्या चौकशी दरम्यान सोनिया गांधी यांनी पूर्णपणे सहकार्य केले.

हे ही वाचा – Rahul Gandhi Twitter Account: यामुळे राहुल गांधी यांचं अकाऊंट ट्विटरने केलं होत सस्पेंड

त्याचप्रमाणे लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार(meera kumar) यांना सुद्धा कोरोनची लागण झाली आहे. मीरा कुमार यांनी ट्विट करत सांगितले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे सध्या मी होम क्वारंटाईन आहे. सर्वंनी आपली काळजी घ्यावी’. असं आवाहनही मीरा कुमार यांनी केलं.

हे ही वाचा –  Rahul Gandhi Press Conference : मी स्वच्छ आहे, मोदींना घाबरत नाही – राहुल गांधी

 

First Published on: August 13, 2022 2:21 PM
Exit mobile version