Punjab Election: पंजाब काँग्रेसकडून ८६ उमेदवारांची यादी जाहीर; सोनू सूदची बहीण मालविका मोगामधून लढणार

Punjab Election: पंजाब काँग्रेसकडून ८६ उमेदवारांची यादी जाहीर; सोनू सूदची बहीण मालविका मोगामधून लढणार

Punjab Election: पंजाब काँग्रेसकडून ८६ उमेदवारांची यादी जाहीर; सोनू सूदची बहीण मालविका मोगामधून लढणार

काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ८६ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. चमकौर साहिबमधून सध्या पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, अमृतसर पूर्वेकडून नवजोत सिंह सिद्धू आणि मोगामधून सोनू सूदची बहीण मालविका सूद यांना काँग्रेसचे तिकिट मिळाले आहे. तर खासदार प्रताप सिंह बाजवा कादियानमधून आणि गायक सिद्धू मूसवाला मानसामधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय गृहमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांना डेरा बाबा नानकचे तिकिट दिले आहे, तर पंजाबचे उपमुख्यमंत्री ओम प्रकाशी सोनी यांना अमृतसर सेंट्रलमधील रिंगणातून बाहेर करण्यात आले आहे.

काँग्रेस पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सुजानपूहून नरेश पुरी, पठानकोटहून अमित विज, गुरदासपूरहून बरिंदरजीत सिंह, श्रीहरगोविंदपूरमधून मनदीप सिंह, डेरा बाबा नानकमधून सुखजिंदर सिंह रंधावा, राजा सांसीमधून सुखविंदर सिंह सरकारिया आणि अमृतसर उत्तरमधून सुनील यांना तिकिट मिळाले आहे.

अमृतसर पश्चिमेतून राजकुमार, अमृतसर सेंट्रलतून ओमप्रकाश सोनी, अमृतसर पूर्वतून नवजोत सिंह सिद्धू, अमृतसर दक्षिणेतून इंदरबीर सिंह बोलारिया, तरन तारनतून डॉक्टर धर्मवीर अग्निहोत्री, कपूरथलातून राणा गुरजीत सिंह आणि सुलतानपूर लोधीतून नवतेज सिंह चीमा काँग्रेसच्या रिंगणातून लढणार आहेत.

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर मतदानाची मोजणी १० मार्चला होणार आहे. २०१७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या होत्या. तर २० जागा जिंकून आम आदमी पार्टी दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरली होती. शिरोमणी अकाली दलला फक्त १५ तर भाजपला फक्त ३ जागा मिळाल्या होत्या. पंजाब विधानसभेत १७७ जागा आहेत.


हेही वाचा – BJP candidate list UP: भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, योगी आदित्यनाथ कुठून लढणार?


 

First Published on: January 15, 2022 5:11 PM
Exit mobile version