गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकांची (gujarat assembly elections 2022) तारीख जाहीर झाल्यापासून गुजरात मध्ये सर्वच पक्ष, नेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. सर्वांसाठीच ही निवडणूक महत्वाची आहे. अशातच काँग्रेस (congress) पक्षाकडून गुरुवारी रात्री उशिरा गुजरात निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमधील 46 उमेदवारांना पक्षाकडून तिकिटांचे वाटप करण्यात आले आहे. यापूर्वी पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत 43 उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते.

1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी 46 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दुसरी यादी जाहीर झाल्यामुळे पक्षाने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या ही 89 वर पोहोचली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली केली होती. ही यादी 43 उमेदवारांची आहे.

दुसऱ्या यादीतील उमेदवारांमध्ये भुज येथील अर्जनभाई भुडिया, जुनागढमधील भिखाभाई जोशी, सुरत पूर्व येथील अस्लम सायकलवाला, सूरत उत्तर येथील अशोकभाई पटेल यांचा समावेश आहे. दुसरीकडे वलसाडमधून कमलकुमार पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यातील भारतीय जनता पक्षाला (BJP) सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस मोठया प्रमाणावर सक्रिय झाला आहे. मागील दोन दशकांहून अधिक काळ भाजपची गुजरातमध्ये सत्ता आहे. 182 जागांच्या गुजरात विधानसभेसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे तर मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे.

काँग्रेससाठी गुजरात विधानसभा निवडणूक ही खूप महत्वाची आहे. त्यासाठी काँग्रेस गुजरातमध्ये (gujarat assembly elections 2022) कंबर कसून कामाला लागला आहे. अशातच काँग्रेस खासदार राहुल गांधी(rahul gandhhi ) हे सुद्धा पक्ष बांधणीच्या उद्देशाने भारत जोडो यात्रेला निघाले आहेत. कन्याकुमारी पासून ही भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) सुरु झाली आहे.


हे ही वाचा –  Gujarat Elections : क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी लढवणार निवडणूक, भाजपाकडून उमेदवारी जाहीर

First Published on: November 11, 2022 8:49 AM
Exit mobile version