गुवाहाटी त्वरित सोडा, आसामची प्रतिमा खराब होतेय; आसामच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे शिंदेंना पत्र

गुवाहाटी त्वरित सोडा, आसामची प्रतिमा खराब होतेय; आसामच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे शिंदेंना पत्र

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार गुवाहाटीत आहेत. जवळपास दोन ते तीन दिवसापासून ते गुवाहाटीच्या रेडिसन हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे आसाममधील नागरीक आणि पक्षांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, गुवाहाटी त्वरित सोडा, आसामची प्रतिमा खराब होतेय, अशा प्रकारचं पत्र आसामच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिलं आहे.

एकनाथ शिंदेंसह महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार हे गुवाहाटीत आले आहेत. यामुळं माध्यमांमध्ये गुवाहाटीची प्रतीमा बदनाम होत आहे. बंडखोर आमदारांनी त्वरित आसाम सोडावं. हे आमदार गुवाहाटीत असल्यानं आसाम दबनाम होते आहे, असं पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांनी लिहिलं आहे.

भूपेन कुमार बोराह यांचे ट्वीट


आसाममधील लोकं हे नैतिकता आणि मूल्यांचा आदर करतात, याची आपल्याला जाणीव असेल. तुम्ही महाराष्ट्रातून काही आमदारांना गुवाहाटीत आणलं. गुवाहाटीतील आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून घोडाबाजार केला जात असल्याचा आरोप होतोय. यामुळं आसामची प्रतीमा खराब होत आहे. तसेच आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून पूरग्रस्त लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, असं भूपेन कुमार बोराह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी काल जोरदार घोषणाबाजी करत रॅडिसन हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याठिकाणी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबल्याने याठिकाणी आसाम पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये घुसता आले नाही.


हेही वाचा : शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलवर तृणमूल काँग्रेसचा हल्लाबोल


 

First Published on: June 24, 2022 3:09 PM
Exit mobile version