लोबो आणि कामत यांच्यावर काँग्रेस करणार कारवाई, मुकुल वासनिक गोव्यात

लोबो आणि कामत यांच्यावर काँग्रेस करणार कारवाई, मुकुल वासनिक गोव्यात

गोव्यात देखील राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्वत:च पदभार स्वीकारला आहे. गोव्यात राजकीय घडामोडी सुरू असताना खासदार मुकुल वासनिक यांना गोव्यात पाठवण्यात आलं आहे. याबाबत काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

काँग्रेसने गोवा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना गोवा विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून हटवलं आहे. गोवा डेस्क प्रभारी गुंडू राव यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. काँग्रेसचे गोवा युनिटचे नेते मायकल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे भाजपशी संगनमताने पक्षाविरुद्ध कट रचत आहेत, काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करेल, असं दिनेश गुंडू राव यांनी म्हटलं आहे.

एललोपी मायकल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे गोव्यात काँग्रेसमध्ये पक्षांतर व्हावं यासाठी भाजपसोबत कट रचत होते यामुळे लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असं राव म्हणाले.

गोव्यातील काँग्रेसचे आमदार प्रत्यक्ष पक्षातून न फुटता विधानसभेत स्वतःचा एक गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आमदारांचा हा गट गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मायकल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार असून हे दोन्ही नेते पक्षांतर करीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे.


हेही वाचा : बंडखोरांवर कारवाई, तर निष्ठावंताचे शिवसेनेकडून कौतुक


 

First Published on: July 11, 2022 8:59 AM
Exit mobile version