‘त्या’ मंदिरातील आदित्यनाथांची मूर्ती हटवली; ‘योगी’समर्थकाची पोलिसात तक्रार

‘त्या’ मंदिरातील आदित्यनाथांची मूर्ती हटवली; ‘योगी’समर्थकाची पोलिसात तक्रार

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मूर्ती एका मंदिरात बसवण्यात आली असून, योगीसमर्थक त्यांची पूजा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रभाकर मौर्य असे या योगी समर्थकांचे नाव आहे. प्रभाकर यांनीच योगी आदित्यनाथ यांचं मंदिर उभारलं होतं. मात्र, आते हे मंदिर काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (controversy came in the idol of Yogi aadityanath was removed from the temple)

कल्याण भदरसामधील मंदिरातून योगींची मूर्ती हटविण्यात आली आहे. कल्याण भदरसामधील मंदिरात प्रभाकर हे सकाळी व संध्याकाळी नेहमी आदित्यनाथ यांच्या मूर्तीची आरती करत होते. मोर्या यांनी मुख्यमंत्री योगींच्या समर्थनार्थ शेकडो गाणी देखील गायली आहेत. मात्र, आता या मंदिरातील योगींची मूर्ती काढून टाकण्यात आली आहे. मंदिराचे संस्थापक प्रभाकर मौर्य यांच्या काकांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

ज्या खडकाळ जमीनीवर योगी आदित्यनाथ यांचे मंदिर उभारण्यात आल होतं. त्यावर त्यांच्या वारसांचा ताबा आहे. शिवाय प्रभाकर यांनी मूर्ती बसवलेल्या जागेवरही त्यांचाच ताबा आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. रविवार 25 सप्टेंबर रोजी पीएसीसह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तात येथील मूर्ती हटविण्यात आली आहे.

यासंदर्भात पोलिसांशी बातचित करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी बोलण्यास नकार दिल्याचे समजते. परंतु, येथील जमीन सरकारी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण भदरसामधील मंदिरातील योगी आदित्यनाथ यांची मूर्ती यूट्यूबवर प्रभाकर मौर्य यांनी बसवली होती. यूट्यूबवर प्रभाकर मौर्य यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. योगींच्या मंदिराच्या बांधकामात जो काही खर्च झाला आहे, तो यूट्यूबवरून कमावलेल्या पैशातून केल्याचे प्रभाकर मौर्य यांनी सांगितले.


हेही वाचा – रशियातील शाळेत अंदाधुंद गोळीबार; 7 मुलांसह 13 जणांचा मृत्यू

First Published on: September 26, 2022 4:29 PM
Exit mobile version